G20 Summit 2023: मुकेश अंबानी ते गौतम अदानी, देशातील हे टॉप 500 उद्योगपती G20 मध्ये होणार सहभागी

G20 Summit 2023: दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी भारतातील टॉप 500 उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
Indian businessmen Ambani, Adani among invitees to the G20 summit dinner
Indian businessmen Ambani, Adani among invitees to the G20 summit dinner Sakal
Updated on

G20 Summit 2023: दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी भारतातील टॉप 500 उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी ते गौतम अदानी यांसारखे सुमारे 500 उद्योजक 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 शिखर परिषदेनंतर डिनरला उपस्थित राहणार आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन, भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांसारखे अनेक दिग्गज उद्योगपतीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

(Indian businessmen Ambani, Adani among invitees to the G20 summit dinner)

जगातील आघाडीचे राजकारणी यात सहभागी होणार आहेत

चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर भारत परकीय गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय म्हणून जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

G-20 कार्यक्रमाच्या या खास डिनरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, जपानचे पीएम फुमिओ किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांसारखे अनेक राजकारणी विविध देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Indian businessmen Ambani, Adani among invitees to the G20 summit dinner
‘फिनटेक’ने स्वनियामक यंत्रणा उभारावी - शक्तिकांत दास

भारत हा जगातील उद्याेगपतींसाठी व्यापार आणि गुंतवणुकीसाठी एक आकर्षक देश आहे, विशेषत: चीनची आर्थिक वाढ मंदावली असताना, जगातील सर्वात प्रभावशाली अर्थव्यवस्थांचा समूह असलेल्या G20 मधील नेतृत्वाचा फायदा घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी दूरसंचार ते मीडिया आणि ऊर्जा ते वित्त अशा अनेक उद्योगांमध्ये गुंतवणूक केली आहे. दोघांनाही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून क्रमवारीत स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्यांची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे.

Indian businessmen Ambani, Adani among invitees to the G20 summit dinner
NIFTY 50 Index: मुकेश अंबानींना NSEचा दणका! नवी कंपनी जाणार निफ्टीबाहेर, काय आहे कारण?

9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. त्याला भारत मंडपम असे नाव देण्यात आले आहे.

हे केंद्र खास तयार करण्यात आले आहे जेथे जागतिक नेते भविष्यातील धोरणांवर चर्चा करतील. येथे एका डिनरचेही आयोजन केले जाणार आहे ज्यामध्ये देशातील टॉप-500 उद्योजक सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.