Indian Household: अन्न, कपडे की मनोरंजन, भारतीय लोक सर्वात जास्त पैसा कुठे खर्च करतात? अहवालात माहिती उघड

Indian Household Spending: लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या भारतामध्ये लोक अन्नावर कमी पैसे आणि कपडे आणि मनोरंजन इत्यादींवर जास्त पैसे खर्च करत आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने शनिवारी भारतीय कुटुंबांच्या खर्चाशी संबंधित सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालाचा हवाला देत ही माहिती दिली.
indian household spending food clothes or entertainment know where indians are spending the most money
indian household spending food clothes or entertainment know where indians are spending the most money Saka
Updated on

Indian Household Spending: लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या भारतामध्ये लोक अन्नावर कमी आणि कपडे आणि मनोरंजन इत्यादींवर जास्त पैसे खर्च करत आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने शनिवारी भारतीय कुटुंबांच्या खर्चाशी संबंधित सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालाचा हवाला देत ही माहिती दिली. या अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय कुटुंबांचा घरगुती खर्च दुपटीने वाढला आहे. (Indian household spending food clothes or entertainment know where indians are spending the most money)

भारतीय कुटुंबे अन्नावर कमी, कपडे आणि मनोरंजनावर जास्त खर्च करत आहेत. सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील सरासरी मासिक दरडोई खर्च 2011-12 मध्ये 2,630 रुपयांवरून वाढून अंदाजे 6,459 रुपये झाला आहे. याच कालावधीत ग्रामीण भारतात खर्च 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे.

indian household spending food clothes or entertainment know where indians are spending the most money
Reliance Disney: डिस्ने आणि रिलायन्सची हातमिळवणी! मनोरंजन क्षेत्रात अंबानींचा दबदबा वाढणार; काय आहे प्लॅन?

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतीय कुटुंबे खाद्यपदार्थांवर कमी खर्च करत आहेत तर कपडे, मनोरंजन आणि करमणुकीवर अधिक खर्च करत आहेत.

अहवालानुसार, ग्रामीण भागातील मासिक अन्नाचा वाटा 2011-12 मधील 53 टक्क्यांवरून 46.4 टक्क्यांवर घसरला. शहरी भागात, अन्नाचा वाटा पूर्वीच्या 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर घसरला.

indian household spending food clothes or entertainment know where indians are spending the most money
Wheat Production : गहू होणार स्वस्त, तर तूरडाळ महाग ; तुरीला अवकाळीचा फटका

ग्राहक खर्च सर्वेक्षण भारतीय कुटुंबांच्या खर्चाची माहिती देत असते आणि अर्थव्यवस्थेतील मागणीचे मूल्यांकन करण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. हा डेटा सरकार किरकोळ महागाई आणि सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) मोजण्यासाठी वापरेल.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2017-2018 सर्वेक्षण जाहीर केले नाही. प्रशासन आर्थिक आकडेवारी लपवत आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.