Banks : तब्बल ३५ हजार कोटी रुपये देशातील बॅंकांमध्ये पडून!

देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील कोट्यवधी खात्यांमध्ये वर्षानुवर्षे व्यवहार होत नाहीत. त्या खात्यातील रक्कम तशीच पडून राहते.
Bank Account
Bank AccountSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील कोट्यवधी खात्यांमध्ये वर्षानुवर्षे व्यवहार होत नाहीत. त्या खात्यातील रक्कम तशीच पडून राहते. दावा असलेले खातेदार बँकांकडे फिरकत नाहीत. तसेच खात्यात कोणताही व्यवहार करत नाही. देशात अशा जवळपास १० कोटी २४ लाख ५९९ खात्यांत वर्षानुवर्षेे कोणताही व्यवहार झालेला नाही. या खात्यात फेब्रुवारी २०२३ च्या शेवटपर्यंत ३५ हजार कोटी १२ रुपयांची विनादाव्याची (अनक्लेम्ड) रक्कम जमा आहे. वर्षानुवर्षेे पडलेल्या या रकमेची माहिती रिझर्व्ह बँकेला देऊन ती रक्कम हस्तांतरित करावी लागते.

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बहुतांश जणांचे खाते आहे. यात मृत झालेल्या खातेदारांचे व्यवहार होत नाही. संबंधित खातेदारांच्या वारसांना याची माहिती दिली जाते. तसेच ज्या खात्यात एक वर्षापेक्षा जास्त कालवधीत व्यवहार झाला नसेल, अशा खातेदारांना बँकेकडून सूचना दिल्या जातात. त्याला खाते पुन्हा क्रियाशील करून घ्यावे लागते. तसेच ज्या खात्यात वर्षानुवर्षे व्यवहार झालेला नाही त्याची माहिती बँकेकडून एकत्रित केली जाते.

ज्या खात्यांमध्ये मागील दहा वर्षापासून व्यवहार झाला नाही, अशा खात्यांची माहिती बँका जाहीर करून त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देत असतात. फेब्रुवारी २०२३ पर्यंत देशात स्टेट बँकेकडे सर्वाधिक २ कोटी १७ लाख ८० हजार ७५७ खाती होती. त्यात ८ हजार ८६ कोटी रुपये अदावाकृत (अनक्लेम्ड) होते. त्याखालोखाल कॅनरा बँकेत १ कोटी ५६ लाख २२ हजार २६२ खाती असून त्यात ४ हजार ५५८ कोटी रुपये होते.

Bank Account
Government Scheme : लग्नाच्या वयात मुलीला मिळतील ६४ लाख रुपये; या योजनेत गुंतवणूक करा

अनेकांचे एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असतात मात्र काही जण त्या खात्यांचा वापर करत नाहीत. ज्या बँक खात्यात एक वर्षापर्यंत कोणतीही व्यवहार होत नाही असे खाते निष्क्रिय खाते मानले जाते. जर एखाद्या खात्यात २४ महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही तर असे खाते डॉर्मंट खात्याच्या श्रेणीत टाकले जाते. निष्क्रिय खाते असेल तर त्याला पुन्हा अॅक्टिव्ह करता येते. डॉर्मंट खात्याला सुद्धा केवायसी करून पुन्हा ॲक्टिव्ह करता येते. मात्र कित्येक खात्यात वर्षानुवर्षे व्यवहार होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.