Paytm: भारतीय स्टार्टअप संस्थापकांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांना पेटीएमवरील अलीकडील निर्बंधांवर पत्र लिहिले आणि त्यांना फिनटेक इकोसिस्टमवर संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
पत्रावर किमान डझनभर संस्थापकांनी स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारत मॅट्रिमोनीचे मुरुगवेल जानकीरामन, कॅपिटलमाइंडचे दीपक शेनॉय, Innov8 चे रितेश मलिक, GOQii चे विशाल गोंडल, PB Fintechचे यशिश दहिया आणि MakeMyTrip चे राजेश मागो यांचा समावेश आहे. असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.
अहवालानुसार, पत्रात असे लिहिले आहे की, “RBIचे सध्याचे, Paytm पेमेंट्स बँकेवर लागू केलेल्या निर्बंधामुळे संपूर्ण FinTech इकोसिस्टमवर दूरगामी आणि हानिकारक परिणाम होऊ शकतात.
अलीकडील निर्देशांचा पेटीएम पेमेंट्स बँकेच्या लाखो वापरकर्त्यांवर देखील परिणाम झाला आहे आणि ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी अशा निर्बंधांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.” पेटीएम पेमेंट्स बँकेवरील निर्बंधांमुळे देशाच्या व्यवसायाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.
मध्यवर्ती बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. नव्या ठेवी घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पेटीएम वापरणारे लोक घाबरले आहेत. आरबीआयने एवढे मोठे पाऊल का उचलले हा प्रश्न आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने कोणत्या नियमाचे उल्लंघन केले? पेटीएम पेमेंट बँकेने जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन केले आहे का?
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या लाखो खात्यांमध्ये केवायसी नियमांचे पालन करण्यात आले नाही. म्हणजे बँकेला आपले ग्राहक कोण आहेत हे माहीत नव्हते. यामुळे फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा धोका वाढतो. अहवालानुसार, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबीएल) मध्ये केवायसीशिवाय लाखो खाती आहेत.
अशी अनेक प्रकरणे समोर आली होती ज्यामध्ये एका पॅन कार्डचा वापर अनेक खाती उघडण्यासाठी करण्यात आला होता. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यातून मनी लाँड्रिंग होण्याचीही शक्यता आहे. या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. या आधारे आरबीआयने कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.