सध्या भारतात फेस्टिव सीझन सुरू आहे. सण-उत्सवाच्या काळात देशात लोक मोठ्या प्रमाणात खरेदीही करतात. सणांचं औचित्य साधून कित्येक कंपन्या ऑफर्सची घोषणा करतात. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात कपडे आणि इतर गोष्टींची खरेदी होताना दिसत आहे.
मात्र, या सगळ्यात भारतातील लोक अंडरवेअर किंवा इनरवेअरकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. याला कारण म्हणजे, फेस्टिव सीझन सुरू होऊनही अंडरवेअर्सच्या विक्रीमध्ये वाढ होताना दिसत नाहीये. जॉकी, रुपा आणि डॉलर अशा मोठ्या कंपन्यांसोबतच अंतर्वस्त्रे बनवणाऱ्या लहान कंपन्यांनाही याचा फटका बसतो आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार; महिला, पुरूष किंवा लहान मुलं या कोणत्याही कॅटेगरीमध्ये अंतर्वस्त्रांची म्हणावी अशी विक्री होत नाहीये. तुलनेने बाहेरील कपड्यांची मात्र जोरदार विक्री सुरू आहे. याचं कारण काय असू शकतं याबाबत कित्येक तर्क-वितर्क केले जात आहेत.
अंतर्वस्त्रे बनवणारी मोठी कंपनी असणाऱ्या जॉकीचं मार्केट डाऊन झाल्याचं दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 7.5 टक्क्यांची घट दिसून आली. तर कंपनीचे सेल्स तब्बल 11.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
हीच परिस्थिती बाकी ब्रँड्सचीही आहे. जॉकी आणि लक्स ब्रँड्सची पॅरंट कंपनी असलेल्या पेज इंडस्ट्रीजला मोठा फटका बसला आहे. रुपा कंपनीचे शेअर्सही 52 टक्क्यांहून अधिक कमी झाला आहे. TV9 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
युरोमॉनिटर इंटरनॅशल या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील अंडरवेअर मार्केट हे 5.8 बिलियन डॉलर्स, म्हणजेच 48,123 कोटी रुपये एवढं आहे. यामध्ये पुरुषांचं मार्केट 39 टक्के आहे, तर महिलांचं 61 टक्के.
असं म्हणतात, की एखाद्या देशात जेव्हा अंतर्वस्त्रांची विक्री कमी होते, तेव्हा ते देशाची अर्थव्यवस्था ठीक नसल्याचे संकेत असतात. कारण लोक केवळ अशा गोष्टींवरच खर्च करू लागतात ज्या अतिशय गरजेच्या असतील किंवा इतरांना दिसू शकतील. याला 'अंडरवेअर इंडेक्स' असंही म्हटलं जातं.
अंडरवेअरची विक्री कमी होणं हे भविष्यात येणाऱ्या मंदीचे संकेतही मानले जातात. त्यामुळेच देशातील वाढती महागाई हे अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट होण्याचं मुख्य कारण समजलं जात आहे. तसंच, भविष्यात देशात आर्थिक मंदी येऊ शकते असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.