Sale in India: भारतीयांनी कार किंवा आयफोनवर नाही तर 'या' वस्तूंवर खर्च केले 5,000 कोटींहून अधिक रुपये

Cosmetics Sale in India: गेल्या 6 महिन्यांत देशातील टॉप 10 भारतीय शहरांमध्ये 'या' वस्तू सर्वात जास्त विकल्या गेल्या.
Sale in India
Sale in IndiaSakal
Updated on

Cosmetics Sale in India: भारतीय स्त्रिया या सौंदर्य प्रसाधने वापरण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. आता देशातील मेकअप वस्तूंच्या खरेदीबाबत मोठी आकडेवारी समोर आली आहे. भारतातील कॉस्मेटिक मार्केटचा विस्तार एवढा प्रचंड होत आहे की कोणीही आश्चर्यचकित होऊ शकेल.

Kantar Worldpanel ने भारतात केलेल्या प्राथमिक अभ्यासानुसार, देशातील भारतीय खरेदीदारांनी गेल्या 6 महिन्यांत सौंदर्यप्रसाधन उत्पादनांवर 5,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. यासाठी सुमारे 10 कोटी सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करण्यात आली आहे.

या अभ्यासातील आकडेवारीनुसार, आणखी एक गोष्ट आढळून आली आहे की, ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या सौंदर्यप्रसाधने खरेदी करणार्‍या नोकरदार महिला सरासरी भारतीय खरेदीदारापेक्षा 1.6 पट जास्त खर्च करतात.

ऑनलाइन शॉपिंगमध्ये भारतीय पुढे

या 10 कोटी सौंदर्यप्रसाधनांमध्ये प्रामुख्याने लिपस्टिक, नेलपॉलिश आणि आयलाइनर सारख्या उत्पादनांचा समावेश आहे जे गेल्या 6 महिन्यांत देशातील टॉप 10 भारतीय शहरांमध्ये विकले गेले.

कांतार वर्ल्ड पॅनेलने या श्रेणीतील भारतातील हा पहिलाच अभ्यास केला आहे आणि त्यातील कॉस्मेटिक मार्केटबद्दलची आकडेवारी देशातील लोकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

यावरून असे दिसून येते की, 6 महिन्यांत 5,000 कोटी रुपयांच्या सौंदर्यप्रसाधनांची मोठी खरेदी करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 40 टक्के खरेदी ऑनलाइन करण्यात आली आहे.

Sale in India
Share Market Today: गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सूचवले 10 दमदार शेअर्स; देतील भरघोस परतावा

अभ्यास संस्थेचे काय म्हणणे आहे?

कांतार वर्ल्ड पॅनेलचे दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक के. रामकृष्णन म्हणाले की आशिया हे आधीच जगाचे सौंदर्य केंद्र आहे आणि दक्षिण कोरियासारखे देश जागतिक स्तरावर सौंदर्याचा ट्रेंड सेट करत आहेत.

अधिकाधिक महिला कामासाठी बाहेर पडत असल्याने भविष्यात सौंदर्य प्रसाधने क्षेत्राचा विस्तार आणि प्रगती होणार आहे यात शंका नाही.

Sale in India
Richest MLA: 'या' पक्षांचे आमदार भाजपपेक्षाही श्रीमंत! 4,001 आमदारांची संपत्ती 3 राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त

विविध सौंदर्यप्रसाधनांची वाढती मागणी

गेल्या सहा महिन्यांत रंगीत सौंदर्यप्रसाधनांची 1,214 कोटी रुपयांची विक्री झाल्याचे अभ्यासात आढळून आले आहे आणि ही सरासरी आकडेवारी आहे. एकूण विक्रीपैकी, लिप उत्पादनांची विक्री 38 टक्के आहे, त्यानंतर नखे उत्पादनांची विक्री झाली आहे.

भारतीयांचे छंद बदलत आहेत

भारतीय ग्राहक आता काजळ आणि लिपस्टिक यांसारख्या पारंपारिक सौंदर्यप्रसाधनांच्या पलीकडे जाऊन प्राइमर्स, आय शॅडो आणि कन्सीलर यांसारख्या उत्पादनांकडे वळत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.