Salary Hike: सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन वर्षात होणार पगार वाढ? लवकरच होणार निर्णय

Bank Employees Salary Hike: नवीन वर्षात बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
India's bank unions agree to 17 percent salary hike but demand a 5-day work week
India's bank unions agree to 17 percent salary hike but demand a 5-day work week Sakal
Updated on

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नवीन वर्षात बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. 7 डिसेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन्समध्ये पगार सुधारणांवर एकमत झाले आहे.

2021-22 या आर्थिक वर्षापासून 5 वर्षांसाठी पगारात 17 टक्के वार्षिक वाढ करण्यावर एकमत झाले आहे. पगारातील ही वाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र, पगार करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी शनिवारी बँकांना सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

India's bank unions agree to 17 percent salary hike but demand a 5-day work week
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! सलग पाचव्यांदा व्याजदर जैसे थे; रेपो दर 6.5 टक्केच राहणार

5 दिवसांच्या कामकाजाबाबत लवकरच निर्णय

याचा अर्थ असा की द्विपक्षीय करारासाठी IBA आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स आणि इतर युनियन आणि संघटना यांच्यात सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. मात्र, पाच दिवसांच्या कामकाजाचा निर्णय जाहीर झाल्यावरच युनियन अंतिम करारावर स्वाक्षरी करतील.

अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत आयबीएकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे की नाही हे त्यांनी सांगितले नाही.

इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि इतर बँक युनियन यांच्यात 7 डिसेंबर रोजी झालेल्या पगारवाढीच्या निर्णयानुसार, पगार आणि भत्त्यांसह सरासरी 17 टक्के वाढ होणार आहे. आणि नवीन वेतनश्रेणी 5 वर्षांसाठी लागू असेल. या वाढीमुळे अंदाजे 12449 कोटी रुपये खर्च होणार आहे.

India's bank unions agree to 17 percent salary hike but demand a 5-day work week
Nifty Record: आरबीआयच्या निर्णयानंतर बाजारात तुफान तेजी, NSE निफ्टीने प्रथमच पार केला 21,000चा टप्पा

नवीन वर्षात घोषणा होऊ शकते

अलिकडच्या काही वर्षांत बँकांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे कर्मचारी आणि संघटनांचे म्हणणे आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता निवडणुकीपूर्वी वेतन करार होणे अपेक्षित आहे. बँक कर्मचारी हा महत्त्वाचा मतदार आधार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.