India's Diamond Sector: भारताचे हिरे क्षेत्र आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन वर्षांत आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये तीव्र घट झाल्यामुळे पेमेंट डिफॉल्टचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच फॅक्टरी बंद होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान होत आहे. आर्थिक संशोधन संस्था जीटीआरआयने बुधवारी ही माहिती दिली.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे (GTRI) संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले, आयात आणि निर्यातीमुळे पेमेंट डिफॉल्ट, फॅक्टरी बंद पडणे आणि मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील हिरे उद्योगाशी संबंधित 60 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरुन भारताच्या हिरे उद्योगावरील संकट किती गंभीर आहे हे दिसते.
या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलून भविष्य सुरक्षित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इकॉनॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये 18.5 अब्ज डॉलर्स वरून 2023-24 मध्ये 24.5 अब्ज डॉलर्सवर हिऱ्याची आयात घसरली आहे. ते म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षाचा जागतिक हिऱ्यांच्या पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे.
रशिया हा एक मोठा हिरा उत्पादक देश आहे आणि त्यावरील निर्बंधांमुळे व्यापार आणखी गुंतागुंतीचा झाला आहे. तसेच जागतिक हिऱ्यांचा व्यापार मंदावला आहे. श्रीवास्तव म्हणाले की, प्रयोगशाळेत उगवलेल्या हिऱ्यांच्या वाढत्या ग्राहकांच्या मागणीचा नैसर्गिक हिऱ्यांच्या मागणीवर परिणाम होत आहे.
असे मानले जाते की प्रयोगशाळेत उगवलेले हिरे अधिक किफायतशीर आणि टिकाऊ असतात. जीटीआरआयने असेही म्हटले आहे की दुबई हिऱ्यांचे उत्पादन करत नाही, तरीही भारताच्या हिऱ्यांच्या आयातीत त्याचा वाटा सतत वाढत आहे.
दुबई बोत्सवाना, अंगोला, दक्षिण आफ्रिका, रशिया येथून रफ हिरे आयात करते आणि नंतर ते भारतात निर्यात करते. भारतीय हिरे उद्योगामध्ये हिरे कापणे, पॉलिश करणे आणि निर्यात करणे यासारख्या विविध कामांमध्ये गुंतलेल्या 7,000 हून अधिक कंपन्या आहेत. या कंपन्याही जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे चिंतेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.