WPI Inflation: जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये महागाई कमी झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई फेब्रुवारीमध्ये 0.20% पर्यंत खाली आली आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 0.27% वरून 0.20% वर आली आहे.
प्राथमिक वस्तूंची महागाई 3.84% वरून 4.49% पर्यंत वाढली आहे. अन्नधान्य महागाई 3.79% वरून 4.09% पर्यंत वाढली आहे. इंधन आणि उर्जा घाऊक महागाई -0.51% वरून -1.59% पर्यंत कमी झाला आहे. बटाट्याची घाऊक महागाई -8.40% वरून 15.34% पर्यंत वाढली आहे.
घाऊक महागाई म्हणजे घाऊक किंमत निर्देशांक (WPI) म्हणजे घाऊक बाजारात एक व्यापारी दुसऱ्या व्यावसायिकाकडून आकारलेल्या किंमती यात मोजल्या जातात.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी एक निवेदन जारी केले की, 'ऑल इंडिया होलसेल प्राइस इंडेक्स (WPI) आकड्यांवर आधारित महागाईचा वार्षिक दर फेब्रुवारी, 2024मध्ये 0.20 टक्के आहे, जो फेब्रुवारीपेक्षा जास्त आहे.
आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई जानेवारीत 6.85 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये किरकोळ वाढून 6.95 टक्के झाली आहे. भाज्यांच्या महागाईचा दर जानेवारीत 19.71 टक्क्यांवरून फेब्रुवारीमध्ये 19.78 टक्क्यांवर पोहोचला. डाळींच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 18.48 टक्के होता, तो जानेवारीत 16.06 टक्के होता.
कच्च्या तेलाच्या घाऊक महागाईचा दर फेब्रुवारीमध्ये 8.24 टक्क्यांनी वाढला आहे. इंधन आणि वीज महागाईचा दर जानेवारीत -0.51 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये -1.59 टक्के राहिली.
या आठवड्याच्या सुरुवातीला, भारताचा किरकोळ महागाईचा डेटा जाहीर करण्यात आला होता. ज्यामध्ये किरकोळ महागाई दर जानेवारीत 5.10 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर 5.09 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
घाऊक किंमत निर्देशांक हा (WPI) मोठ्या प्रमाणात विकल्या गेलेल्या आणि व्यापार केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील बदलांचे मूल्यांकन करतो. अर्थव्यवस्थांमध्ये महागाई दर मोजण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय)चा वापर केला जातो. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये फक्त वस्तूंचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये सेवांचा समावेश नसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.