Unemployment in India: भारतातील बेरोजगारीत मोठी वाढ; 'या' राज्यात सर्वाधिक बेरोजगार

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने भारतातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.
Unemployment in India
Unemployment in IndiaSakal
Updated on

Indian's Unemployment Rate: सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने भारतातील बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये झपाट्याने वाढला असून तो तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

भारतासह जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची कपात होत असताना ही बेरोजगारी समोर आली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी लोकांना कामावरून काढून टाकले असून हा आकडा आणखी वाढू शकतो. (India's unemployment rate rises to 3-month high of 7.8% in March says CMIE report)

देशातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.30 टक्क्यांपर्यंत वाढला होता, परंतु जानेवारीमध्ये तो 7.14 टक्क्यांवर आला.

शनिवारी जाहीर झालेल्या सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढली असून ती 7.45 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, मार्चच्या नवीन आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर 7.8 टक्क्यांच्या उच्च पातळीवर आहे.

CMIE च्या आकडेवारीनुसार, भारतातील शहरी भागातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर ग्रामीण भागात बेरोजगारी दर 7.5 टक्के आहे.

CMIE चे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी PTI ला सांगितले की, मार्च 2023 मध्ये भारताची कामगार बाजारपेठ खालावली आहे. बेरोजगारी वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील मोठ्या प्रमाणात झालेली कर्मचारी कपात आहे.

कर्मचारी संख्या कमी :

महेश ब्यास यांनी सांगितले की, कामगार बाजारातील परिस्थिती बिघडल्यामुळे रोजगार दर फेब्रुवारीमधील 36.9 टक्क्यांवरून मार्चमध्ये 36.7 टक्क्यांवर घसरला आहे. या कालावधीत कर्मचाऱ्यांची संख्या 409.9 दशलक्ष वरून 407.6 दशलक्ष इतकी कमी झाली आहे.

Unemployment in India
GST Revenue Collection: अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी; मार्च महिन्यात जीएसटी कलेक्शन 1.6 लाख कोटी पार

सर्वात जास्त बेरोजगारी कोणत्या राज्यात आहे?

मार्चच्या आकडेवारीनुसार, हरियाणात सर्वाधिक 26.8 टक्के बेरोजगारी होती. यानंतर राजस्थानमध्ये 26.6 टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये 23.1 टक्के, सिक्कीममध्ये 20.7 टक्के, बिहारमध्ये 17.6 टक्के, झारखंडमध्ये 17.5 टक्के आणि महाराष्ट्रामध्ये 5.5 टक्क्यांपर्यंत बेरोजगारी दर पोहोचला आहे.

'या' कारणांमुळे बेरोजगारी वाढली :

CIEL HR सर्व्हिसेसचे संचालक आणि CEO आदित्य मिश्रा म्हणाले की ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान सणासुदीच्या हंगामानंतर रिटेल, पुरवठा साखळी, वित्तीय सेवा आणि ई-कॉमर्स या क्षेत्रातील रोजगार कमी झाला. याशिवाय आयटी, टेक्नॉलॉजी आणि स्टार्टअप्सच्या क्षेत्रातही नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

याशिवाय मार्च महिन्यात पर्यटनाची मागणीही कमी झाली आहे. टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक रितुपर्णा चक्रवर्ती यांनी सांगितले की, बेरोजगारीची आकडेवारी सध्याच्या आर्थिक वातावरणात चिंताजनक आहे. भारतीय कंपन्यांनी नोकरभरती कमी केली आहे. जागतिक स्तरावरील परिस्थितीचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.

Unemployment in India
शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()