Mutual Fund SIP: जुलै २०२३ मध्ये SIP द्वारे गुंतवणूक प्रथमच १५ हजार कोटी रुपयांच्या पुढे, खात्यांची संख्या ६.८० कोटी

Mutual Fund SIP: ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येनेही उच्चांक नोंदवला आहे.
Mutual Fund SIP
Mutual Fund SIPSakal
Updated on

मुंबई: जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे विक्रमी १५ हजार २४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची पसंती ‘एसआयपी’लाच आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या महिन्यात ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येनेही उच्चांक नोंदवला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) ने ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे.

‘अॅम्फी’च्या आकडेवारीनुसार, जून २०२३ मधील ६.६५ कोटींच्या तुलनेत जुलैमध्ये ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ६.८० कोटी झाली. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्येही (एयूएम) लक्षणीय वाढ झाली आहे.

जून महिन्यातील एयूएम ७.९३ लाख कोटी रुपयांवरून ८.३२ लाख कोटींवर गेले आहे. या वाढीचे श्रेयही ‘एसआयपी’चे आहे. ‘एसआयपी’मुळे मिळत असलेल्या सुविधा आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे गुंतवणूकदारांची वाढती पसंती मिळत असल्याचे ‘अॅम्फी’ने म्हटले आहे.

इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक मात्र, जूनच्या तुलनेत घटली, तर लिक्विड फंडांमध्ये सर्वाधिक ५१,९३८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आढळून आले आहे.

Mutual Fund SIP
Made in India: मोदी सरकारचा मोठा निर्णय! गुगलशी स्पर्धा करण्यासाठी उभारणार 'आत्मनिर्भर' वेब ब्राउझर

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या मल्टी- कॅप श्रेणीमध्ये २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक आली, तर लार्ज-कॅप फंडांमधून १,८८० कोटी आणि फोकस्ड फंडांमधून १,०६६ कोटींची गुंतवणूक बाहेर पडली. जुलैमध्ये डेट फंडांमध्ये विक्रमी ६१,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जूनमध्ये या फंडांतून १४,१३५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.

‘ईटीएफ’मध्ये जुलैमध्ये ३,४०२ कोटींची गुंतवणूक आली. गेल्या काही वर्षांत पॅसिव्ह फंडांचे आकर्षण वाढले असून, या फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता १७ टक्क्यांहून अधिक आहे.

२०१५ मध्ये हे प्रमाण केवळ १.४ टक्के होते. जुलैमध्ये सुमारे १७ ओपन-एंडेड फंड योजना दाखल झाल्या, त्यात ६,७२३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Mutual Fund SIP
Multibagger Stocks: 8 रुपयांच्या शेअरने बनवले कोट्यधीश, पण आता तज्ज्ञांचा शेअर्स विकण्याचा सल्ला, काय आहे कारण?

विविध फंड प्रकारांमध्ये झालेली गुंतवणूक

  • इक्विटी फंड ७,६२५ कोटी

  • स्मॉल-कॅप श्रेणीमध्ये सर्वाधिक ४,१७१ कोटी

  • हायब्रीड फंडांमध्ये १२,४२० कोटी

  • आर्बिट्राज फंडांमध्ये १०,०७४ कोटी

  • डेट फंडांमध्ये विक्रमी ६१,४४० कोटी

  • गोल्ड ‘ईटीएफ’मध्ये ४५६ कोटींची गुंतवणूक

Mutual Fund SIP
SEBI IPO Rules: IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना SEBI चा मोठा दिलासा, IPO बंद होण्याच्या...

‘एसआयपी’मध्ये झालेली भरीव वाढ म्युच्युअल फंड आणि ‘अॅम्फी’च्या व्यापकतेचा परिणाम आहे. जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविलेल्या मोहिमा, बाजाराच्या वाढीमध्ये भाग घेण्याची गुंतवणूकदारांची आकांक्षा यामुळे ‘एसआयपी’मधील गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. शिस्तबद्ध गुंतवणुकीचे फायदे लोकांच्या लक्षात येत असल्याने पद्धतशीर गुंतवणुकीची संस्कृती वाढू लागली आहे.

- एन. एस. व्यंकटेश, सीईओ, अॅम्फी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.