Infosys Hiring: इन्फोसिसचा कॅम्पस प्लेसमेंटला ब्रेक, जागतिक मंदीमुळे घेतला मोठा निर्णय

Infosys Campus Hiring: कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे सध्या पुरेसे कर्मचारी आहेत.
Infosys Campus Hiring
Infosys Campus HiringSakal
Updated on

Infosys Campus Hiring: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने सध्या कॅम्पस प्लेसमेंटला ब्रेक लावला आहे. इन्फोसिसने या वर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी अद्याप कोणतीही योजना तयार केलेली नाही. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निलांजन रॉय यांनी ही माहिती दिली आहे. सप्टेंबर 2023 चे निकाल जाहीर झाल्यानंतर Infosys CFO ने सांगितले की या वर्षी कॅम्पस प्लेसमेंटसाठी कोणतीही योजना नाही.

कंपनीचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे सध्या पुरेसे कर्मचारी आहेत. आणि बाजारातील वातावरण लक्षात घेऊन सध्या कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत 6,212 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Infosys Campus Hiring
UBS Report: SBI अन् Axis बँकेला दणका! UBS ब्रोकरेजने रेटिंग केले कमी, किरकोळ कर्जाबद्दल व्यक्त केली चिंता

आयटी कंपन्या दरवर्षी लाखोंच्या संख्येने अभियांत्रिकी पदवीधरांची भरती करतात. भारतात दरवर्षी सुमारे 15 लाख अभियांत्रिकी पदवीधर बाहेर पडतात. यापैकी 20-25 टक्के भरती आयटी कंपन्यांकडून केली जाते. पण अमेरिकेतील मंदीच्या भीतीने कंपन्या आता नवीन लोकांना कामावर घेण्याचा विचार करत नाहीत.

त्याचा परिणाम इन्फोसिसच्या निर्णयावर दिसून येत आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीचे सीएफओ निलांजन रॉय म्हणाले की, कंपनी सध्या नवीन कॅम्पस हायरिंगचा विचार करत नाही.

Infosys Campus Hiring
Tata Motors: IPO लाँच होण्यापूर्वीच, टाटा मोटर्सने विकला टाटा टेक्नॉलॉजी मधील 9.9% हिस्सा, 'इतके' कोटी मिळणार

इन्फोसिसमध्ये किती कर्मचारी कमी केले?

इन्फोसिसमधील कर्मचार्‍यांची संख्या 7,530 ने कमी झाली आहे आणि आता नियुक्त केलेले फ्रेशर्स प्रतीक्षा करत आहेत. निलांजन यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी कंपनीने सुमारे 50 हजार फ्रेशर्सना कामावर घेतले होते. मागणीच्या अंदाजानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावर्षी मंदीमुळे हायरिंग झाली कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.