Infosys GST Notice
Infosys GST NoticeSakal

Infosys: इन्फोसिसच्या अडचणीत मोठी वाढ; जीएसटीने पाठवली 32,000 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण?

Infosys GST Notice: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीला 32,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची नोटीस मिळाली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
Published on

Infosys GST Notice: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीला 32,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची नोटीस मिळाली आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने कंपनीला नोटीस बजावली आहे.

डीजीजीआयचा दावा आहे की इन्फोसिसने 32,403 कोटी रुपयांचा कर भरला नाही. ही कर मागणी जुलै 2017 ते 2021-22 पर्यंत आहे. डीजीजीआयच्या बंगळुरू कार्यालयाने आरोप केला आहे की इन्फोसिसने आपल्या परदेशातील शाखांकडून सेवा प्राप्त केल्या आहेत परंतु त्यावर कर भरला नाही.

Infosys GST Notice
best stocks to buy : कोणते शेअर ठरतील फायदेशीर?

डीजीजीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे की विदेशी शाखांकडून प्राप्त झालेल्या सेवा IGST कायदा 2017 च्या कलम 2 (11) अंतर्गत आयात मानल्या जातात. या प्रकरणी इन्फोसिसने शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीने आपली सर्व कर थकबाकी भरली आहे आणि डीजीजीआयने नमूद केलेल्या खर्चावर जीएसटी लागू होत नाही.

कंपनीने या प्रकरणी राज्य आणि केंद्राच्या सर्व नियमांचे पालन करत असल्याचे सांगितले. जून तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढून 6368 कोटी रुपये झाला आहे, तर उत्पन्न 39315 कोटी रुपये आहे.

Infosys GST Notice
Job Alert: तरुणांसाठी खुशखबर! 'या' पोर्टलवर 20 लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध, सरकारने दिली माहिती

शेअर बाजारातील तज्ज्ञ अनिल सिंघवी यांनी सांगितले की, कंपनीला 32,000 कोटी रुपयांची जीएसटीची कर नोटीस मिळाली आहे, परंतु गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी घाबरू नये, शेअर्समध्ये घसरण झाल्यास खरेदी करावी लागेल. म्हणजेच आज जर शेअर घसरणीसह उघडला तर तुम्ही तो खरेदी करावा.

Infosys GST Notice
Wilful Defaulters: कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आरबीआय मोठी कारवाई करणार

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.