Insta Reels: इंस्टाग्राम रील्समुळे चक्क सौंदर्य प्रसाधनांच्या खरेदीत होतीय मोठी वाढ; अहवालात माहिती उघड

Insta Reels: गेल्या काही वर्षात भारतातील तरुणांमध्ये इंस्टाग्राम रील्सची क्रेझ खूप वाढली आहे.
Instagram reels influence beauty purchases in India, study reveals
Instagram reels influence beauty purchases in India, study reveals Esakal
Updated on

Insta Reels: भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 70 टक्के तरुणांचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आहे. गेल्या काही वर्षात भारतातील लोकांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्सची क्रेझ खूप वाढली आहे. नुकताच एक सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारतातील 80 टक्के लोक ऑनलाइन सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

मेटाच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्युटी प्रॉडक्ट्स शोधणाऱ्या तरुणाईची संख्याही मोठी आहे. अनेक तरुण इंस्टाग्राम रील्स पाहिल्यानंतर सौंदर्य उत्पादने खरेदी करण्याचा निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णयात इंस्टाग्राम रील्सचा मोठा वाटा आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, 47 टक्के ग्राहकांनी सांगितले की ते इंस्टाग्राम रील्स पाहिल्यानंतर सौंदर्य उत्पादने खरेदी करण्याचा निर्णय घेतात. अलीकडे झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून आले की, ज्यामध्ये 10 पैकी 9 ग्राहकांनी मान्य केले की ते सौंदर्य उत्पादने शोधण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्सची मदत घेतात.

इंस्टाग्राम रील्सच्या मदतीने सौंदर्य उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या या सर्वेक्षणात 47 टक्के आहे. हे सर्वेक्षण 6 ते 64 वयोगटातील ग्राहकांवर करण्यात आले आहे.

Instagram reels influence beauty purchases in India, study reveals
Layoffs 2023: फिजिक्सवालाचा मोठा निर्णय! 120 कर्मचार्‍यांना दिला नारळ; काय आहे कारण?

या वर्षी जूनमध्ये देशातील 74 विविध शहरांतील 2,000 ग्राहकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

2020 मध्ये कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. यासोबतच गेल्या काही वर्षांत उदयास आलेल्या नवीन ब्रँड्सनी अशा उत्पादनांची मागणी वाढवण्यात मोठा हातभार लावला आहे.

कोरोना संकटानंतर 68 टक्के लोकांनी ऑनलाइन सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेले 80 टक्के लोक सोशल मीडियावर ब्युटी ब्रँड्स शोधतात.

Instagram reels influence beauty purchases in India, study reveals
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण न केल्याबद्दल सेबीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.