Interest Rates: आरबीआयने व्याजदर ठरवण्याची बँकांना दिली मोकळीक; सर्वसामान्यांना फायदा होणार का?

RBI on Bank Interest Rates: बँका आता ठेवी आणि कर्जावरील व्याजदर स्वत: ठरवू शकतील, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवी आणि कर्जावरील व्याजदर ठरवण्यासाठी बँकांना मोकळीक दिली आहे. म्हणजेच आता बँका स्वतः व्याजदर ठरवू शकतात.
RBI on Bank Interest Rates
RBI on Bank Interest RatesSakal
Updated on

RBI on Bank Interest Rates: बँका आता ठेवी आणि कर्जावरील व्याजदर स्वत: ठरवू शकतील, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवी आणि कर्जावरील व्याजदर ठरवण्यासाठी बँकांना मोकळीक दिली आहे. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, बँक ठेवी आणि कर्जावरील व्याजदर नियंत्रणमुक्त करण्यात आले आहेत.

म्हणजेच आता बँका स्वतः व्याजदर ठरवू शकतात. त्यामुळे त्यांनी अशा योजना आणण्यावर भर द्यावा ज्यामुळे ठेवीची रक्कम वाढू शकेल. याचा सर्वसामान्यांना फायदा होईल का ते जाणून घेऊया.

'या' कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला

बँकांनी ठेवी वाढवण्यासाठी अनोख्या आणि आकर्षक योजना आणल्या पाहिजेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले. त्या म्हणाल्या, ठेवी आणि कर्ज ही वाहनाची दोन चाके असून ठेवींमध्ये हळूहळू वाढ होत आहे.

बँकांनी कोअर बँकिंगवर म्हणजेच मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यामध्ये ठेवी वाढवणे आणि ज्यांना निधीची गरज आहे त्यांना कर्ज द्यावे.

RBI on Bank Interest Rates
Bank Account: बँक खात्यासाठी आता 4 नॉमिनी असणार; लोकसभेत बँकिंग कायदा विधेयक सादर, काय आहेत नवे नियम?

बँका व्याजदर का वाढवतात?

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की व्याजदर नियंत्रणमुक्त आहेत आणि बँका निधी आकर्षित करण्यासाठी ठेवींचे दर वाढवतात. व्याजदर ठरवण्यास बँका स्वतंत्र आहेत.

दास यांनी सावध केले की यामुळे बँकांमधील संरचनात्मक तरलतेच्या समस्या उघड होऊ शकतात. म्हणून, नाविन्यपूर्ण योजना आणि ऑफरद्वारे घरगुती आर्थिक बचत एकत्रित करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

RBI on Bank Interest Rates
Inflation Effect FD:वाढत्या महागाईचा ‘एफडी’वर परिणाम

सर्वसामान्यांना कसा फायदा होणार?

बँकांमधील एफडी किंवा कर्जाचे व्याजदर नियंत्रणमुक्त केल्याने केवळ बँकांनाच नाही तर ग्राहकांनाही फायदा होईल. अनेकदा बँका निधी आकर्षित करण्यासाठी ठेवींचे दर वाढवतात. म्हणजेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका अनेकदा ठेवींवर व्याजदर वाढवतात.

बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवल्यास बँकांना अधिकाधिक एफडी मिळतील, ज्यामुळे बँकेत जमा होणारी रक्कम वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.