Power Finance : पॉवर फायनान्सच्या कर्जरोख्यांवर साडेसात टक्क्यांपर्यंत व्याज

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने पाच हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांचा (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर - एनसीडी) इशू बाजारात आणला आहे.
Power Finance Corporation Limited
Power Finance Corporation Limitedsakal
Updated on

मुंबई - पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने पाच हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांचा (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर - एनसीडी) इशू बाजारात आणला आहे. त्यावर गुंतवणूकदारांना साडेसात टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळेल.

पी एफ सी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकारांना ही माहिती दिली. हा इशू पाचशे कोटी रुपयांचा असून आणखी साडेचार हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भरणा झाल्यास ती रक्कमही स्वतःकडे ठेवण्याचे अधिकार पी एफ सी ला मिळाले आहेत.

हे प्रत्येक कर्जरोखे एक हजार रुपयांचे असून त्यासाठी किमान दहा हजार रुपयांची (दहा कर्जरोखे) व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत (एक कर्जरोखा) गुंतवणूक करावी लागेल. या डिबेंचर साठी २१ जुलै ते २८ जुलै दरम्यान गुंतवणूक करावी लागेल. पुरेसे अर्ज न आल्यास गुंतवणुकीची मुदत वाढवली जाईल, तर पुरेशी रक्कम जमल्यास गुंतवणुकीची ही मुदत लवकर देखील बंद केली जाईल.

या कर्जरोख्यांची मुदत तीन वर्षे, दहा वर्षे व पंधरा पंधरा वर्षे अशी आहे. त्यानुसार त्यांच्यावर ७.४४ टक्के ते ७.५५ टक्के व्याज दरवर्षाला मिळेल. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला ७७,५६८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर मागील वर्षअखेरीस त्यांना ७६,२६१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

कर्जावरील व्याजाचे उत्पन्न वाढल्याने यावेळी त्यांचे उत्पन्न वाढले. तर या वर्षअखेरीस त्यांना २१,१७८ कोटी रुपयांचा निवळ नफा मिळाला. मागील वर्षी त्यांचा हा नफा १८,७६८ कोटी रुपये होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.