Yoga Day 2024: योगा इकोनॉमीने देशाला रोजगार मिळवून दिला! PM मोदींनी सांगितला योग दिनाचा 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास

International Yoga Day 2024: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगात योगाबद्दल उत्साह वाढत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभागी झाले होते.
International Yoga Day 2024
International Yoga Day 2024Sakal
Updated on

International Yoga Day 2024: दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशात आणि जगात योगाबद्दल उत्साह वाढत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये एका विशेष योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत योगाच्या विस्तारामुळे सर्व जुन्या धारणा बदलल्या आहेत. गेल्या 10 वर्षांत प्राचीन भारतीय पद्धतीचे पालन करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की, "योग अर्थव्यवस्थेने" भारतात रोजगार निर्माण केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांनी 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित केला. पंतप्रधान म्हणाले की, "मी देशातील लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योगासने करणाऱ्या लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय योग दिनाने 10 वर्षांचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण केला आहे. 2014 मध्ये मी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला भारतासह 177 देशांनी पाठिंबा दिला होता आणि तेव्हापासून योग दिवस नवीन रेकॉर्ड बनवत आहे.''

जगभरात योगाच्या विस्तारामुळे भारतातील योग पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "गेल्या 10 वर्षात, योगाच्या विस्तारामुळे योगाशी संबंधित धारणा बदलली आहे. आज जग एक नवीन योग अर्थव्यवस्था पुढे जाताना पाहत आहे. भारतात, ऋषिकेश आणि काशीपासून केरळपर्यंत, योग पर्यटन विकसीत झाले आहे. जगभरातून पर्यटक भारतात येत आहेत कारण त्यांना भारतात योग शिकायचा आहे. लोक त्यांच्या फिटनेससाठी वैयक्तिक योग प्रशिक्षकही ठेवत आहेत. या सर्वांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.''

International Yoga Day 2024
Union Budget 2024: अर्थसंकल्पात AIवर लागणार रोबोट कर? निर्मला सीतारामन यांना अर्थतज्ज्ञांनी दिल्या सूचना

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिन सुरु झाल्यापासून जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. "योगाविषयी लोकांचे आकर्षणही वाढत आहे. मी कुठेही जातो आणि ज्यांना (जागतिक नेते) भेटतो, ते मला कुतूहलाने योगाबद्दल विचारतात. योग हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत चालला आहे," असेही ते म्हणाले.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, योगामुळे शक्ती, चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढतो. पीएम मोदींनी जनतेला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठी प्राचीन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

International Yoga Day 2024
RBI Action: आजपासून 'या' बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; आरबीआयने केली मोठी कारवाई, काय आहे प्रकरण?

"यावर्षी भारतात फ्रान्समधील एका 101 वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या. पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित केले. आज योगावर संशोधन केले जात आहे. जगभरातील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि संस्थांचे शोधनिबंध प्रकाशित केले जात आहेत,” असेही पीएम मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()