Employment Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या NDA सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आणि त्यात करण्यात येणाऱ्या घोषणांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात सरकार 1 कोटी तरुणांना मोठ्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देणार आहे. तसेच, 5,000 रुपयांच्या मासिक भत्त्यासह 12 महिन्यांची पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. याशिवाय, बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी 2024-25 मध्ये दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
• प्रथमच EPFO मध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण.
• नोकरीच्या पहिल्या चार वर्षांत कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही त्यांच्या EPFO योगदानानुसार थेट प्रोत्साहन दिले जाईल
उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेचा 30 लाख तरुणांना फायदा होणार असून अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत, सरकार EPFO मध्ये योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा 3000 रुपये देईल. या योजनेचा लाभ 50 लाख लोकांना होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.