PPF Investment: पीपीएफ खात्यात 5 एप्रिलपूर्वी करा गुंतवणूक; अन्यथा होऊ शकते हजारोंचे नुकसान

Invest in PPF before 5 April: तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर 5 एप्रिल ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 2025-25 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. जर तुम्ही या महिन्यात तुमच्या PPF खात्यात पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर हे काम 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा.
PPF
Invest in PPF before 5 AprilSakal
Updated on

Invest in PPF before 5 April: तुम्हीही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर 5 एप्रिल ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 2024-25 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. जर तुम्ही या महिन्यात तुमच्या PPF खात्यात पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर हे काम 5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा.

असे न केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्ही तुमच्या PPF खात्यात वर्षातून एकदा पैसे जमा करा किंवा दर महिन्याला नियमितपणे गुंतवणूक करा, दोन्ही बाबतीत हे काम महिन्याच्या 5 तारखेपूर्वी केले पाहिजे.

5 तारखेपूर्वी गुंतवणूक करण्याचा काय फायदा?

जर तुम्ही PPF खात्यात 5 एप्रिलपूर्वी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच रकमेवर अधिक व्याज मिळू शकते. म्हणजेच 6 एप्रिलला तेवढीच रक्कम जमा केल्यास तुम्हाला कमी व्याज मिळेल.

जर तुम्ही एकाच वेळी संपूर्ण वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्या रकमेवरील एका महिन्याच्या व्याजाइतके नुकसान होईल.

कारण, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेच्या नियमांनुसार, PPF खात्यातील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या अखेरीस खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेच्या आधारावर मोजले जाते.

PPF
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.५ टक्के; जागतिक बँकेचा अंदाज

पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर सरकार 7.1 टक्के दराने व्याज देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत गुंतवणूक केली तर त्याला जमा केलेल्या रकमेवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळतो.

जर तुम्ही 5 तारखेनंतर गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त 5 ते 30 तारखेदरम्यान सर्वात कमी शिल्लक रकमेवरच व्याजाचा लाभ मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या महिन्यात व्याजाचे नुकसान होऊ शकते.

PPF
Rahul Gandhi: शेअर बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक पण एकही कार मालकीची नाही; राहुल गांधींची संपत्ती किती?

असे आहे गणित

PPF कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या आर्थिक वर्षात 5 एप्रिलपर्यंत एकरकमी 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 15 वर्षे सुरू ठेवली, तर तुम्हाला 15 वर्षांत जमा केलेल्या रकमेवर एकूण 18.18 लाख रुपये व्याज मिळेल.

त्याच वेळी, जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त 17.95 लाख रुपये व्याज मिळेल. अशा स्थितीत, तुम्हाला 15 वर्षांत 23,188 रुपयांचे व्याजाचे नुकसान होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.