नव्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ एकामागून एक असे नवनवे उच्चांक स्थापन करत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय म्युच्युअल फंडातील एकूण मालमत्तादेखील नव्या शिखरावर पोहोचत आहे. अशा वेळी म्युच्युअल फंडांच्या अनेक नव्या योजना बाजारात येत आहेत.
नव्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
नव्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकsakal
Updated on

भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ एकामागून एक असे नवनवे उच्चांक स्थापन करत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय म्युच्युअल फंडातील एकूण मालमत्तादेखील नव्या शिखरावर पोहोचत आहे. अशा वेळी म्युच्युअल फंडांच्या अनेक नव्या योजना बाजारात येत आहेत. एखादी नवी म्युच्युअल फंड योजना बाजारात येते, तेव्हा त्याची किंमत दहा रुपये प्रतियुनिट असते. बाजारातील चांगल्या आणि जुन्या म्युच्युअल फंडांच्या युनिटचा बाजारभाव यापेक्षा नक्कीच खूप अधिक असतो. यामुळेच नव्या म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा अधिक ओढा दिसून येतो. मात्र, असे करताना गुंतवणूकदारांनी पुढील तीन मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

‘एनएफओ’ आणि ‘आयपीओ’मधील फरक

न्यू फंड ऑफर (एनएफओ) आणि इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) यामध्ये मूलभूत फरक असतो. ‘आयपीओ’मध्ये एखादी कंपनी बाजारात नव्याने शेअर आणते. अशा शेअरची संख्या मर्यादित असते, त्यामुळे अशा शेअरच्या मर्यादित पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असेल (ओव्हरसबस्क्रिप्शन), तर थोड्याच दिवसात अशा शेअरचा बाजारभाव वेगाने वाढतो. याउलट ‘एनएफओ’मध्ये म्युच्युअल फंड युनिटची संख्या अमर्यादित असल्यामुळे अल्पकाळात असा फायदा मिळण्याची शक्यता नसते.

नवे फंड स्वस्त नसतात

दहा रुपयांना मिळणारा नवा फंड स्वस्त असतो आणि बाजारातील जुने फंड महाग असतात, असा गैरसमज होऊ शकतो. मात्र, कोणताही फंड हा जमा झालेल्या रकमेतून बाजारातील शेअरमध्ये गुंतवणूक करत असतो, त्यामुळे त्या शेअरचा बाजारभाव किती आहे, यावर गुंतवणूकदारांचा फायदा-तोटा अवलंबून असतो. त्यामुळे दहा रुपयांना उपलब्ध असलेला फंड स्वस्त आहे, असे मानणे चुकीचे आहे. जुने फंड महाग वाटत असले, तरी त्यांनी शेअर बाजारातून केलेली खरेदी कमी किमतीला असते; ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. म्हणूनच म्युच्युअल फंडांच्या युनिटची किंमत पाहण्याऐवजी त्याचा परतावा पाहावा. हे स्पष्ट करण्यासाठी उदाहरणादाखल एक जुना फंड आणि बाजारात नुकताच आलेला एक नवा फंड यांची तुलना सोबतच्या चौकटीत दिली आहे.

जुना फंड नवा फंड

फंडाची सध्याची ‘एनएव्ही’ १००० रु.

प्रतियुनिट १० रु.

प्रतियुनिट

गुंतवणूक करत असलेल्या शेअरच्या

बाजारमूल्यात एका वर्षातील वाढ २० टक्के १० टक्के

एक वर्षानंतर फंडाची ‘एनएव्ही’ १२०० रु. प्रतियुनिट ११ रु.

प्रतियुनिट

एका वर्षातील परतावा २० टक्के १० टक्के

यातून लक्षात येते, की फंडाची ‘एनएव्ही’ किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर तो फंड कोणत्या शेअरमध्ये आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करत आहे, हे महत्त्वाचे आहे.

नव्या फंडांचे प्रगतीपुस्तक उपलब्ध नसते

जुन्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे सोपे असते. अशा फंडांनी आतापर्यंत किती परतावा दिला आहे, त्यांची मालमत्ता किती आहे, पूर्वीच्या तेजी-मंदीच्या काळात त्यांची कामगिरी कशी होती, स्पर्धक म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ते सरस होते की नाही, यासारखी माहिती सहज उपलब्ध असते. नव्या फंडांच्या बाबतीत मात्र, अशी काहीही माहिती उपलब्ध नसते कारण त्या फंडाची कामगिरी अजून सुरूच झालेली नसते. त्यामुळे अशा फंडात केवळ तो ‘नवा आहे’ म्हणून मोठी गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

बाजारात येणाऱ्या प्रत्येक नव्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा अट्टाहास टाळावा. अशा फंडांच्या गुंतवणूक धोरणाचा अभ्यास करावा आणि त्याची गुंतवणूक उद्दिष्टे समजावून घ्यावीत. नवा फंड नावीन्यपूर्ण असेल आणि अशा प्रकारच्या फंडात आपली यापूर्वी गुंतवणूक नसेल, तरच त्यात गुंतवणूक करावी. नव्या फंडात गुंतवणूक करताना शेअर बाजार खूप वरच्या पातळीवर असेल, तर एकरकमी मोठी गुंतवणूक न करता ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

जुना फंड नवा फंड

फंडाची सध्याची ‘एनएव्ही’ १००० रु.

प्रतियुनिट १० रु.

प्रतियुनिट

गुंतवणूक करत असलेल्या शेअरच्या

बाजारमूल्यात एका वर्षातील वाढ २० टक्के १० टक्के

एक वर्षानंतर फंडाची ‘एनएव्ही’ १२०० रु. प्रतियुनिट ११ रु.

प्रतियुनिट

एका वर्षातील परतावा २० टक्के १० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.