शेअर बाजार
गोपाळ गलगली , ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
स्थूलता आणि जलद हालचाल या परस्परविरोधी गोष्टी आहेत. स्थूल माणूस पट्कन उठू शकत नाही, भरभर चालू शकत नाही. लवकर दमतो. हत्तीचेदेखील तसेच आहे. तो क्वचितच बसतो. बसला, तर उठणे त्याला कठीण जाते. त्याची चाल धीरगंभीर असते. तो क्वचितच पळतो. आकाशात कावळ्यांचे थवे, बगळ्यांच्या रांगा दिसतात. मात्र, गरूड पक्षी क्वचितच दिसतो.
शेअर बाजारामध्येदेखील तसेच आहे. हजारो लहान-मोठ्या कंपन्या कार्यरत असतात. काही वरचढ असतात, काहींची हालचाल खुंटलेली असते, तर काही ठप्प पडलेल्या असतात. काहींची मैत्री असते, तर काही एकमेकींना खाली खेचत असतात. काही कंपन्या एखादी घटना घडली, तरच हालचाल दाखवतात. जुन्या कंपन्या आपले अस्तित्व टिकवण्यासाठी श्रम खर्ची घालत असतात. आपल्याला स्पर्धा निर्माण होऊ नये याकडे त्यांचे लक्ष असते. गुंतवणूकदारांचे पैसे अशा शेअरमध्ये सुरक्षित असतात. मात्र, त्यात वाढ नसते. ‘राइट्स, स्प्लिट्स, बायबॅक, बोनस, डिव्हिडंड’सारख्या क्लृप्त्या अधूनमधून जाहीर करून असे आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत असतात.
परंतु, कांही छोटे हायटेक शेअर आपल्या स्पर्धात्मक गुणवत्तेमुळे चमकत असतात. उत्साही तरूण व्यवस्थापन, हमखास बाजारपेठ, निर्यात बाजार, कमी कामगार, कमी पसारा, यांत्रिक उत्पन्न, महत्त्वाचे उत्पादन किंवा महत्त्वाची सेवा यामुळे अशा कंपन्या यशस्वी होताना दिसत असतात. उत्तम विक्री, उत्तम फायदा, उत्तम ऑर्डर बुक पोझिशन ते बाळगून असतात. ‘हायटेक’ हा त्यांचा परवलीचा शब्द असतो. अशावेळी पतमापन कंपन्या जाग्या होतात आणि अशा कंपन्यांचे गुणगान करू लागतात.
सारांश : गुंतवणुकीवरील वाढता परतावा आणि जोखीम कमी करायची असेल, तर स्थूलता दाखविणाऱ्या परंतु, नावाजलेल्या शेअरमधून बाहेर पडून ‘गरूडांच्या पिल्ला’मागे लागले पाहिजे.
हत्ती, गरूड आणि गरूडाची पिल्ले
या प्राणी, पक्ष्यांचे गुणवर्णन लागू पडणारे शेअर आपण निवडायला शिकले पाहिजे. त्यासाठी तीक्ष्ण नजर पाहिजे. किरकोळ शेअरच्या गर्दीपासून दूर राहिले पाहिजे.
बड्या कंपन्या
रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचयूएल, एशियन पेंट्स, आयटीसी
गरूडझेपेसाठी सक्षम कंपन्या
झोमॅटो, जिओ, कमिन्स, रेल विकास, रेलटेल, केपीआयटी, सुझलॉन, बीईएल, इंडियन हॉटेल्स, आयआरसीटीसी, टीव्हीएस मोटर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.