Investment : नव्या करप्रणालीतही गुंतवणूक आवश्‍यक

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मध्ये नवी करप्रणाली हीच मुख्य करप्रणाली असेल, अशी घोषणा करण्यात आली
Investment in new tax system required money management marathi news
Investment in new tax system required money management marathi newsSakal
Updated on

अॅड. सुकृत देव

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी (आकारणी वर्ष २०२४-२५) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यापूर्वी, अनेक कंपन्यामध्ये पगारदार प्राप्तिकरदात्यांकडून जून महिन्यातच, नवी की जुनी करप्रणाली निवडणार आहात, याची विचारणा करण्यात आली. त्याआधारे कंपनीला वर्षभरात किंवा प्रत्येक महिन्याला पगारातून प्राप्तिकर किती कापायचा, वजावट किती आणि कोणती घ्यायची आदी बाबी ठरविणे सोयीस्कर होते.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ मध्ये नवी करप्रणाली हीच मुख्य करप्रणाली असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, जुनी करप्रणालीदेखील वापरण्याची मुभा असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, प्राप्तिकरदात्यांनी नवी करप्रणाली निवडली असेल, तर त्याला प्राप्तिकर गुंतवणुकीची वजावट (काही दिलेल्या वजावटी सोडून) मिळणार नाही. वजावट मिळणार नसली, तरीदेखील करवजावटीसाठी केलेल्या नियोजनाची सवय करदात्यांनी बदलू नये.

- गुंतवणुकीचे नियोजन

नव्या करप्रणालीनुसार प्राप्तिकरदात्यांना लोकप्रिय कलम ८० सी, ८० डी कलमांअंतर्गत वजावट मिळणार नाही, तरीदेखील आर्थिक नियोजन चांगले ठेवायचे असेल किंवा वैयक्तिक पोर्टफोलिओ चांगला करायचा असेल, तर या कलमांअंतर्गत गुंतवणूक करत राहाणे उत्तम आहे. या अंतर्गत आयुर्विमा, गृहखरेदी, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), वैद्यकीय विमा, इक्विटी लिंक्ड बचत योजना (ईएलएसएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), मुदत ठेव आदी योजनांमध्ये गुंतवणूक करता येते.

चांगला परतावा हा दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच मिळतो, हे लक्षात ठेवा आणि नवी करप्रणाली निवडल्यावरनंतरही केलेल्या गुंतवणुकीकडे शुद्ध गुंतवणूक म्हणून बघा, त्याचा नक्कीच फायदा होईल.

आर्थिक वर्ष संपल्यानंतर केलेल्या गुंतवणुकीची पडताळणी करायला विसरू नका. कारण ‘फॉर्म १६’ मध्ये ती दिसणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे प्राप्तिकरदात्यांनी नवी प्रणाली निवडली, की ते गुंतवणूक करण्यासाठी कंटाळा करतील, अनेक लोक हे प्राप्तिकर वजावट (८० सी, ८० डी) मिळविण्यासाठी गुंतवणूक करताना दिसतात, ही चुकीची बाब आहे. गुंतवणूक करणे सर्वांसाठीच आवश्यक आहे.

प्राप्तिकरदात्यांनी विवरणपत्र भरावयाच्या वेळेस निर्णय बदलायचा ठरवला, तर ते कठीण जाईल. कारण वर्षभरात कापलेला प्राप्तिकर (टीडीएस/टीसीएस), नव्या व जुनी करप्रणालीची मर्यादा, कराचा दर व इतर सर्व बाबी तपासाव्या लागतील.

नव्या पर्यायानुसार, मुख्य कलम ८० सीसीडी, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), कलम ८० सीसीएच, अग्निवीर फंड (१०० टक्के) व स्टॅंडर्ड डिडक्शन यांची वजावट मिळणार आहे.

नवी करप्रणाली आर्थिक वर्ष २०२३-२४

एकूण करपात्र उत्पन्न (रु.) __ नवी प्रणाली (टक्के)

० - ३,००,००० -

३,००,००१ - ६,००,००० = ५

६,००,००१ - ९,००,००० = १०

९,००,००१ - १२,००,००० = १५

१२,००,००१ - १५,००,००० = २०

१५,००,००० पेक्षा जास्त = ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.