SIP Investment: ‘एसआयपी’तील गुंतवणूक नव्या शिखरावर; नोव्हेंबरमध्ये १७ हजार कोटींचा ओघ

SIP Investment: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) ही माहिती दिली
Investment in SIP at a new peak; Inflow of 17 thousand crores in November number of accounts record
Investment in SIP at a new peak; Inflow of 17 thousand crores in November number of accounts record Sakal
Updated on

मुंबई, ता. ८ ः म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’च लोकप्रिय पर्याय असल्याचे नोव्हेंबरमधील विक्रमी गुंतवणूक आणि खात्यांच्या उच्चांकी संख्येवरून सिद्ध झाले आहे. नोव्हेंबरमध्ये ‘एसआयपी’द्वारे १७ हजार कोटी रुपयांचा ओघ आला असून, या गुंतवणुकीने नवे शिखर गाठले आहे.

‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येनेही सार्वकालीक उच्चांक नोंदविला आहे. खात्यांची संख्या १४ लाख १० हजारांनी वाढून सात कोटी ४४ लाखांहून अधिक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) आज जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

‘अॅम्फी’च्या आकडेवारीनुसार, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात ‘एसआयपी’द्वारे नोव्हेंबरमध्ये प्रथमच १७ हजार ७३ कोटी रुपयांची उच्चांकी गुंतवणूक करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये ती १६,९२८ कोटी रुपये होती. इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत २२ टक्क्यांनी रोडावली.

नोव्हेंबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये १५,५३६ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. ऑक्टोबरमध्ये ती १९,९५७ कोटी रुपये होती. या श्रेणीमध्ये, स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणूकदारांनी अधिक पंसती दिली असून, या फंडांमध्ये नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे ३,६९९ कोटी आणि २,६६५ कोटींचा ओघ आला.

Investment in SIP at a new peak; Inflow of 17 thousand crores in November number of accounts record
Multibagger Stocks: 8 हजारांचे झाले एक कोटी, 'या' कंपनीने 9 महिन्यात दिला 191 टक्के परतावा

स्मॉल-कॅपमध्ये मात्र, ऑक्टोबरमधील ४,४९५ कोटींच्या तुलनेत थोडी कमी गुंतवणूक झाली आहे. या वर्षात आतापर्यंत स्मॉल-कॅप फंडांमध्ये ३७,७१८ कोटी रुपयांची, तर मिड-कॅप फंडांमध्ये २१,५२० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

दुसरीकडे, लार्ज-कॅप फंडांतून मात्र, वर्षाच्या सुरुवातीपासून गुंतवणूक काढून घेतली जात आहे. आतापर्यंत एकूण २,६८७ कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली आहे.

नोव्हेंबरमध्ये, लार्ज-कॅप फंडांमध्ये केवळ ३०७ कोटी रुपयांची भर पडली आहे. ऑक्टोबरमध्ये यात ७२३ कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. डेट म्युच्युअल फंडांमधूनही नोव्हेंबरमध्ये ४,७०६ कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये तब्बल ४२,६३३ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते, त्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये बाहेर गेलेली गुंतवणूक अत्यल्प आहे.

Investment in SIP at a new peak; Inflow of 17 thousand crores in November number of accounts record
Kalpataru Projects: नव्या ऑर्डर्समुळे कल्पतरू प्रोजेक्ट्सचे शेअर्स उच्चांकावर, 6 महिन्यात दिला 32 टक्के परतावा

ठळक वैशिष्‍ट्ये

  • ‘एसआयपी’द्वारे १७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

  • खात्यांची संख्येचाही सात कोटी ४४ लाखांचा उच्चांक

  • इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये १५,५३६ कोटी रुपयांची गुंतवणूक

  • लार्ज-कॅप फंडांमध्ये केवळ ३०७ कोटी रुपयांची भर

  • डेट म्युच्युअल फंडांमधून ४,७०६ कोटी रुपये बाहेर

  • व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४९ लाख ४ हजार ९९२ कोटींवर

नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ४९ लाख ४ हजार ९९२ कोटी रुपयांवर गेली आहे. डिसेंबरमध्येही हाच वाढीचा सकारात्मक कल सुरू राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

- एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅम्फी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.