Investment Tips: जेव्हा तुम्ही तुमची बचत गुंतवण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला त्यावर चांगला परतावा अपेक्षित असतो. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी उपलब्ध पर्यायांपैकी सोने-चांदी खरेदी करणे किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करणे, हे दोन्ही पर्याय लोकप्रिय आहेत.
अशा स्थितीत प्रश्न पडतो की या दोघांपैकी कुठे गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल?
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे धोके आहेत. त्याचबरोबर सोने-चांदीत नुकसान किंवा चोरी होण्याची भीती असते. शेअर बाजारातील तेजी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आणते आणि जेव्हा मंदी असते तेव्हा सोन्या-चांदीच्या किंमती वाढतात, असा अनेकांचा समज आहे.
गेल्या काही वर्षांचा रेकॉर्ड पाहिला तर सोन्याने सेन्सेक्सच्या तुलनेत दुप्पट परतावा दिला आहे. सुमारे 15 वर्षांपूर्वी सेन्सेक्स 20,285 च्या पातळीवर होता. त्यावेळी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 9,395 रुपये आणि एक किलो चांदीचा भाव 19,520 रुपये होता.
आज सेन्सेक्स 62,885.76 च्या पातळीवर आहे, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,490.00 रुपये आणि एक किलो चांदीचा भाव 70,659 रुपये आहे.
जास्त परतावा कोणी दिला आहे?
वर दिलेल्या किंमती समजून घेतल्यास, गेल्या 15 वर्षांत सोन्याने 400 टक्क्यांहून अधिक तर चांदीने 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सेन्सेक्सने याच कालावधीत गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
15 वर्षांपूर्वी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळाल्याचे यावरून दिसून येते. मात्र, ज्यांनी दीर्घकाळ सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना खूप फायदा झाला आहे.
कोणती गुंतवणूक करणे फायद्याचे होईल?
गेल्या काही वर्षांत सोने-चांदी आणि सेन्सेक्स या सर्वांच्या किंमती झपाट्याने वाढल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना खूप फायदा झाला आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या आकडेवारीच्या विश्लेषणाच्या आधारे तुम्ही निर्णय घेऊ शकता. दीर्घकाळात अधिक नफा मिळविण्यासाठी तुम्ही बाजारातील जोखीम लक्षात घेऊन कोणताही गुंतवणूक पर्याय निवडू शकता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट, सोने-चांदी किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार, सोने-चांदी किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.