Investing : केवळ 5 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश, कोणता आहे हा शेअर ?

शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉक्स तर फार कमी काळात त्यांच्या शेअरहोल्डर्सना श्रीमंत करतात.
Investor millionaire in just 5 years which is this share
Investor millionaire in just 5 years which is this share Sakal
Updated on

Share Market Investment : शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. मल्टीबॅगर स्टॉक्स तर फार कमी काळात त्यांच्या शेअरहोल्डर्सना श्रीमंत करतात. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

हा शेअर आहे इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Integrated Industries Ltd). गेल्या चार वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत, शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 44766.44% परतावा दिला आहे.

29 मार्च 2019 रोजी शेअरची किंमत 1.46 रुपये होती. आता शेअरची किंमत 655.05 रुपयांवर पोहोचली आहे. तर 19 मार्च 2020 रोजी शेअरची किंमत 0.68 रुपये होती. अशा स्थितीत शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.

कंसोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 167 टक्क्यांनी वाढून 46.74 कोटीवरून डिसेंबर तिमाहीत 125 कोटीवर पोहोचला आहे. शिवाय, याच कालावधीत निव्वळ नफा 607 टक्क्यांनी वाढून 1.30 कोटीवरून 9.19 कोटी झाला आहे.

याआधी, कंपनीने, तिच्या 100 टक्के पूर्ण मालकीच्या उपकंपनी, नर्चर वेल फूड प्राइवेट लिमिटेडद्वारे (Nurture Well Food Private Limited) राजस्थानच्या नीमराना इथे वार्षिक 3,400 मॅट्रीक टन प्रति वर्षाच्या क्षमतेचा बिस्किट उत्पादन कारखाना विकत घेतला होता. कंपनी दोन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे.

पहिला म्हणजे अन्न उत्पादनांचे उत्पादन आणि खाद्य उत्पादनांचा व्यापार. कंपनीचा खाद्यपदार्थ उत्पादन विभाग त्याच्या उपकंपनी नर्चर वेल फूड प्राइवेट लिमिटेडमार्फत चालतो आणि त्याच्या बिस्किट उत्पादन कारखान्याच्या माध्यमातून बिस्किटांच्या निर्मितीमध्ये गुंतलेला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.