IPL 2023 Telecast : अंबानी फ्री मध्ये दाखवणार IPL, मोजली मोठी रक्कम, इथे पाहता येणार मोफत सामने

IPL सुरु होण्यापूर्वीच चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
IPL 2023
IPL 2023Sakal
Updated on

IPL 2023 live Free Streaming : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 16वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे.

स्पर्धेपूर्वीचा चाहत्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आयपीएलचे सामने आता विनामूल्य पाहता येणार आहेत. (IPL 2023 live streaming on Jio Cinema in 4K for free in India from March 31)

स्टार इंडियाकडे टीव्हीचे हक्क आहेत आणि Viacom18 कडे डिजिटल अधिकार आहेत. Viacom Jio Cinema अॅपवर 18 सामने ऑनलाइन प्रसारित करणार आहे.

रिलायन्स जिओने सांगितले की, युजर्स 4K रिझोल्यूशनमध्ये सामना पाहू शकतात. यापूर्वी आयपीएलच्या ऑनलाइन प्रसारणाचे अधिकार डिस्ने + हॉटस्टारकडे होते. त्या प्लॅटफॉर्मवर सामने पाहण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागत होते.

Jio Cinema ने गेल्या वर्षीच्या अखेरीस जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे प्रसारण केले होते.

कंपनीने सांगितले आहे की, जिओ सिनेमा वापरकर्ते 12 भाषांमध्ये स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी यांचा समावेश आहे.

IPL 2023
IND vs AUS: कांगारू अडचणीत! तिसऱ्या कसोटीत कशी तयार करणार प्लेइंग-11?

वापरकर्ते त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात. याशिवाय स्क्रीनवर दिसणारा डेटा तुम्ही तुमच्या भाषेतही पाहू शकता. मोबाईल व्यतिरिक्त, वापरकर्ते जिओ सिनेमा अॅप संगणक आणि स्मार्ट टीव्हीवर देखील पाहू शकतात.

बीसीसीआयने चार पॅकेजमध्ये मीडिया हक्क विकले आहेत. बोर्डाला मीडिया हक्कांमधून एकूण 48,390 कोटी रुपये मिळाले. स्टार इंडियाने 23,575 कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले. तसेच Viacom 18 ने 23, 758 कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळवले आहेत.

वायाकॉमने पॅकेज-सी हे नाव देखील ठेवले आहे. यासाठी त्यांनी 2991 कोटी रुपयांची बोली लावली. तर टाइम्स इंटरनेटसह वायकॉमने 1324 कोटींना पॅकेज-डी विकत घेतला.

पॅकेज-ए कडे भारतासाठी टीव्ही अधिकार आहेत आणि पॅकेज-बीकडे भारतासाठी डिजिटल अधिकार आहेत. पॅकेज-सीमध्ये निवडक 18 सामने आणि पॅकेज-डीमध्ये परदेशी टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा समावेश आहे.

IPL 2023
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

रिलायन्सच्या मालकीची Viacom18, ज्याला पॅकेज-डी अधिकार मिळाले आहेत, ते ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि यूकेमध्ये सामने प्रसारित करणार आहेत. त्याच वेळी, टाइम्स इंटरनेट मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका तसेच अमेरिका आणि उर्वरित देशांमध्ये सामन्यांचे प्रसारण करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()