IPL 2024 Ticket Price: आरसीबीच्या एका सामन्याच्या तिकिटाची किंमत 52,938 रुपये; कोण ठरवत किंमत?

IPL 2024 Ticket Price: इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वपूर्ण स्पर्धेत अनेक चांगले सामने झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये असे काही संघ आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु काही संघांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
IPL 2024 Ticket Price
IPL 2024 Ticket PriceSakal
Updated on

IPL 2024 Ticket Price: इंडियन प्रीमियर लीग 2024 सुरू आहे. आतापर्यंत या महत्त्वपूर्ण स्पर्धेत अनेक चांगले सामने झाले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये असे काही संघ आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे परंतु काही संघांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या होम मॅचसाठी एम चिन्नास्वामी स्टेडियमवरील तिकिटाची जास्तीत जास्त किमत 42,350 रुपये आहे परंतु वाढीत्या मागणीमुळे ती किमत 52,938 रुपये झाली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल फ्रँचायझींना स्वतंत्रपणे त्यांच्या सामन्यांसाठी तिकीटाची किमत ठरवण्याची परवानगी दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्स IPL 2024 ची तिकिटे सर्वात स्वस्त विकत आहेत. त्यांचे सर्वात कमी तिकीट 499 रुपये आहे.

मात्र, जेव्हा सामना मोठ्या संघाविरुद्ध असतो तेव्हा तिकीटाचे दर बदलतात. मोठ्या सामन्यांमध्ये तिकिटांच्या किमतीही वाढतात आणि त्यासाठी त्यांना सर्ज प्राइसिंग (जेव्हा एखादी कंपनी मागणी वाढते तेव्हा त्याच्या उत्पादनाची किंवा सेवेची किंमत वाढवते आणि जेव्हा मागणी कमी होते तेव्हा किंमत कमी करते) धोरणाचा अवलंब करावा लागतो.

IPL 2024 Ticket Price
Mukesh Ambani: अंबानी आर्थिक क्षेत्रात करणार मोठा धमाका; जगातील सर्वात शक्तिशाली कंपनीशी केला करार

काही तिकिटांची किमत खूप जास्त आहे, परंतु तरीही चाहते स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद घेण्यासाठी जास्त किमत मोजायला तयार आहेत. मात्र, त्यांच्या संघाची कामगिरी पाहून चाहत्यांचीही निराशा होते आणि त्यामुळे कधी कधी स्टेडियम पूर्णपणे भरत नाही.

IPL 2024 Ticket Price
Raghuram Rajan: 'भारतीय तरुणांमध्ये विराट कोहली सारखी मानसिकता' RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन असं का म्हणाले?

उदाहरणार्थ, या मोसमात आरसीबीची कामगिरी खूपच निराशाजनक झाली आहे, परंतु तरीही त्यांच्या घरच्या सामन्यांना स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. आयपीएलमध्ये आरसीबीचा चाहता वर्ग सर्वात मोठा आहे. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियमचे सर्वात स्वस्त तिकीट 2300 रुपये आहे. तर एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याच्या तिकिटाची किमत 6000 रुपये आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजन मनचंदा म्हणाले, 'फ्राँचायझी तिकीटाची किमत ठरवतात. आम्ही त्यांना पायाभूत सुविधा पुरवतो हे आमचे काम आहे. तिकीट दराशी आमचा काहीही संबंध नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.