IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

IPL Revenue Decline: 2023च्या आर्थिक वर्षात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सर्व संघांची सरासरी कमाई 2019च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 23 टक्के कमी झाली आहे. म्हणजेच कोविड-19च्या आधीच्या तुलनेत कमाईत घसरण झाली आहे.
IPL teams revenue dropped sharply in FY23, could be reaching saturation
IPL teams revenue dropped sharply in FY23, could be reaching saturation Sakal
Updated on

IPL Revenue Decline: 2023च्या आर्थिक वर्षात इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सर्व संघांची सरासरी कमाई 2019च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 23 टक्के कमी झाली आहे. म्हणजेच कोविड-19च्या आधीच्या तुलनेत कमाईत घसरण झाली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात या प्रसिद्ध क्रिकेट टी-20 स्पर्धेच्या कमाईत आणखी चढ-उतार होण्यास वाव नसल्याचे म्हटले आहे.

मार्केट इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म प्रायव्हेट सर्कलने सांगितले की, 'आम्ही महागाई लक्षात घेतली तर महसुलातील ही घसरण खूपच जास्त आहे. गेल्या चार वर्षांत 10 टक्के महागाईचा दर जरी गृहीत धरला तरी आर्थिक वर्ष 2019 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023 मध्ये सर्व संघांच्या कमाईत सरासरी घट 47 टक्क्यांच्या जवळपास होती.

Source: PrivateCircle
Indian Premier League Sakal

अहवालात म्हटले आहे की, महसुलातील घसरणीला ग्राहकांची बदलती प्राधान्ये किंवा मनोरंजनाच्या पर्यायांमधील स्पर्धा यासारखी अनेक कारणे असू शकतात. जर महसूल असाच घसरला किंवा स्थिर राहिला तर आयपीएलचे स्वरूप बदलण्याची गरज भासू शकते, असे खासगी संस्थेने म्हटले आहे. इंडियन प्रीमियर लीगचे महसूल वाटपाची व्यवस्था, खर्च नियंत्रण किंवा धोरणात्मक भागीदारी यासारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

IPL teams revenue dropped sharply in FY23, could be reaching saturation
SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

अहवालातील डेटानुसार कोलकाता नाईट रायडर्सचा आर्थिक वर्ष 2019 मध्ये सर्वाधिक 437 कोटी रुपयांचा महसूल होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे उत्पन्न 424 कोटी रुपये आणि चेन्नई सुपर किंग्जचे उत्पन्न 418 कोटी रुपये होते.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये दिल्ली कॅपिटलचा सर्वाधिक महसूल 367 कोटी रुपये होता. गुजरात टायटन्स 360 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर तर मुंबई इंडियन्स 359 कोटी रुपयांच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहे. FY2019 मध्ये कमाई करणाऱ्या पहिल्या तीन संघांच्या तुलनेत त्यांचा महसूल कमी झाला आहे.

IPL teams revenue dropped sharply in FY23, could be reaching saturation
Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

आर्थिक वर्ष 2019 मध्ये सर्व संघांचा सरासरी महसूल 394.28 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये 307.5 कोटी रुपयांवर आला. पण सर्व संघांच्या प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

स्पॉन्सरशीपच्या बाबतीत, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (रु. 83 कोटी) सर्वाधिक कमाई केली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (78 कोटी) आणि दिल्ली कॅपिटल्स (72 कोटी) यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.