Transrail Lighting ltd IPO : ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडने (Transrail Lighting ltd) आयपीओ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.
गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या डीआरएचपी अर्थात ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, कंपनी आयपीओअंतर्गत 450 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्याचा विचार करत आहे. याशिवाय, कंपनीच्या प्रमोटर अजन्मा होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडची ओएफएसच्या माध्यमातून एक कोटीहून अधिक शेअर्स विकण्याची योजना आहे.
आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करण्यापासून मिळालेल्या रकमेपैकी 250 कोटी खेळत्या भांडवलाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी वापरले जातील. भांडवली खर्चासाठी 90.90 कोटी वापरले जातील आणि उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.
आयपीओनंतर कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे.
मुंबईस्थित ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडमध्ये सध्या प्रमोटर्सचा 86 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. कंपनी 50 कोटीच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते. असे झाल्यास आयपीओमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नवीन शेअर्सची संख्या कमी होईल.
ट्रान्सरेल लायटिंग ही प्रामुख्याने पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन बिझनेससह लॅटिस स्ट्रक्चर, कंडक्टर्स, मोनोपोल्ससाठी इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीवर फोकस करते. कंपनीची 58 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थिती आहे. कंपनी गेल्या 4 दशकांपासून जगभरात टर्नकी बेसिसवर कॉम्प्रिहेन्सिव सॉल्यूशन्स पुरवत आहे. कंपनी रेल्वे आणि नागरी बांधकामाचे प्रोजेक्ट्सही हाती घेते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.