Wipro Cuts Freshers Salary: देशातील आघाडीची IT कंपनी Wipro (IT Company) मध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयटी कर्मचाऱ्यांच्या युनियन एनआयटीईएसने कंपनीच्या या निर्णयाला विरोध केला असून असे निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. युनियनने कंपनीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
यासोबतच उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे की, विप्रोचा हा निर्णय जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये असलेली मंदीचा परिणाम आहे.
बेंगळुरूस्थित IT सेवा कंपनी विप्रोने ज्या कर्मचाऱ्यांना अलीकडेच वार्षिक 6.5 लाख पगाराची ऑफर दिली होती त्यांना विचारले आहे की, ते 3.5 लाख रुपयांचे पॅकेज स्वीकारतील का?
कंपनीने निर्णयाचा पुनर्विचार करावा :
कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नियुक्तीची वाट पाहत होते. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना NITES ने हा निर्णय अन्यायकारक आहे आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे सांगत या निर्णयाचा निषेध केला आहे.
NITES ने कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. आणि मार्ग काढण्यासाठी युनियनशी संवाद साधावा असे सांगितले आहे.
कंपनीशी संपर्क साधला असता, विप्रोने ई-मेलला उत्तर देताना सांगितले की, "जागतिक अर्थव्यवस्थेतील वातावरणातील बदल लक्षात घेऊन आणि कंपनी व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही कर्मचारी योजना राबवत आहोत."
विप्रोने दिले स्पष्टीकरण :
विप्रोने सांगितले की, ''आम्ही जागतिक अर्थव्यवस्था आणि ग्राहकांच्या गरजांचे मूल्यांकन करत आहोत, हा आमच्या भरती योजनांचा एक आवश्यक भाग आहे.
आम्ही कर्मचाऱ्यांच्या वचनबद्धतेची आणि संयमाची प्रशंसा करतो. आम्ही तुमच्यासाठी नवीन संधी ओळखण्याचा प्रयत्न करतो.''
विप्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ''सध्या आमच्याकडे काही प्रोजेक्ट इंजीनियरच्या पोस्ट आहेत ज्यांना 3.5 लाखांची वार्षिक भरपाई दिली जाऊ शकते. आम्ही आमच्या FY23 बॅचमधील सर्व नवीन पदवीधरांना या पोस्टसाठी संधी देऊ शकतो.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.