Income Tax Refund: आता AI द्वारे ITR तपासले जाणार, कर परतावा मिळण्यास होणार उशीर? CAच्या दाव्याने खळबळ

Income Tax Department: प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आता केवळ 2 ते 3 दिवस उरले आहेत. दरम्यान, आयकर विभागाला यंदा रिफंड देण्यास वेळ लागू शकतो, असा दावा केला जात आहे. करदाते वेगाने आयकर विवरणपत्र भरत असून हा आकडा साडेपाच कोटींच्या जवळ पोहोचला आहे.
Income Tax
Income Tax RefundSakal
Updated on

Income Tax Department: प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आता केवळ 2 ते 3 दिवस उरले आहेत. दरम्यान, आयकर विभागाला यंदा रिफंड देण्यास वेळ लागू शकतो, असा दावा केला जात आहे. करदाते वेगाने आयकर विवरणपत्र भरत असून हा आकडा साडेपाच कोटींच्या जवळ पोहोचला आहे. आयकर रिटर्न फाइलिंग पोर्टलमधील त्रुटींमुळे करदात्यांना त्रास होत असला तरी दररोज कोट्यवधी आयटीआर दाखल केले जात आहेत.

परतावा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता

करदात्यांना आता प्राप्तिकर विभागाकडून परतावा पाठवण्याची प्रतीक्षा आहे. साधारणपणे, परताव्याची प्रक्रिया झाल्यानंतर, परतावा पैसे येण्यासाठी 5 ते 10 दिवस लागतात. दरम्यान, चार्टर्ड अकाउंटंट आनंद लुहार यांनी दावा केला आहे की करदात्यांना यावर्षी परतावा मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

Income Tax
Sovereign Gold Bond: गुंतवणूकदारांना मोठा धक्का! सरकार SGB योजना बंद करण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

प्राप्तिकर विभागात AI चा वापर

लुहार यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी प्राप्तिकर विभाग रिटर्न प्रक्रियेत AI चा वापर करत आहे. AI वर आधारित विकसित केलेले सॉफ्टवेअर करदात्याचे पॅन कार्ड आणि आधार कार्डशी संबंधित माहिती मिळवेल आणि नंतर रिटर्नमध्ये दिलेल्या माहितीशी सर्व माहिती तपासेल. प्रथमच या वर्षापासून AIचा वापर केला जात आहे.

Income Tax
N Srinivasan: बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी घेतली सिमेंट व्यवसायातून माघार; बिर्लांना इतक्या कोटींना विकली कंपनी

आयकर फाइलिंग पोर्टलच्या डॅशबोर्डनुसार, चालू हंगामात आतापर्यंत 12.45 कोटी करदात्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे. 29 जुलैच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 5 कोटी 43 लाखांहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. करदात्यांनी 4 कोटी 91 लाखांहून अधिक आयटीआर व्हेरिफाय केले आहेत, तर सुमारे 2 कोटी 36 लाख आयटीआरवर आयकर विभागाने प्रक्रिया केली आहे.

कर तज्ञांनी काय सल्ला दिला?

करदात्यांनी मुदत वाढण्याची वाट पाहू नये, असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी 31 जुलैपर्यंत विवरणपत्र भरावे. जर 31 जुलैपर्यंत रिटर्न भरले नाहीत तर त्यांना उशीरा रिटर्न भरावे लागतील. यासाठी त्यांना दंड भरावा लागणार आहे. याशिवाय करावर व्याजही भरावे लागणार आहे. जर करदात्याला परताव्याचा हक्क असेल, तर रिटर्न न भरल्यामुळे त्याला उशीर होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.