Income Tax Return: आयकर नोटीशीपासून सावधान! ITR भरताना 'या' चुका टाळा, नाहीतर...

Income Tax Return: आयटीआर दिलेल्या तारखेपर्यंत भरला नाही तर तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागेल.
Income Tax Return
Income Tax Returnesakal
Updated on

What you should not do while filing income tax returns:

आयकर विभागाकडून रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की करदात्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांचे विवरणपत्र भरावे. आयकर रिटर्न भरताना करदाते काही सामान्य चुका करतात.

येथे अशाच 10 चुकांची माहिती दिली जात आहे, ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून आयकर रिटर्न भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

ITR भरताना या चुका टाळा

वेळेवर ITR न भरणे

निर्धारित वेळेत रिटर्न न भरणे ही मोठी समस्या आहे. शेवटची तारीख 31 जुलै आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा आयटीआर दिलेल्या तारखेपर्यंत भरला नाही तर तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागेल. हा दंड 5,000 रुपयांपर्यंत असू शकते.

चुकीचा फॉर्म

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अनेकदा असे दिसून येते की लोक चुकीचा फॉर्म निवडतात, त्यामुळे आयटीआर भरला जात नाही.

बँक खाते पडताळणी न करणे

आयकर रिटर्न भरताना तुम्ही तुमच्या बँक खात्याची पडताळणी करावी. अन्यथा परतीचे पैसे अडकू शकतात. यासोबतच इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

ITR पडताळाणी करायला विसरणे

आयकराकडून नोटीस पाठवल्यावर बहुतेकांना ही चूक कळते. म्हणूनच तुम्ही तुमची ITR पडताळणी करून घेतली पाहिजे. अन्यथा ते तुम्हाला महागात पडू शकते. सध्या, आयटीआर पडताळाणी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे.

खोटी माहिती देणे

अनेकदा लोक त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये वैयक्तिक माहिती देताना चुका करतात. या कारणास्तव, जेव्हा तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती द्याल तेव्हा ती सर्व कागदपत्रांमध्ये तपासू पहा आणि नंतर ती योग्यरित्या भरा.

Income Tax Return
Income Tax Return: रिफंड मिळाल्यानंतरही तुम्ही ITR मध्ये करु शकता सुधारणा, कसं ते जाणून घ्या!

चुकीच्या मूल्यांकन वर्षाची निवड

मूल्यांकन वर्ष हे आर्थिक वर्षानंतरचे वर्ष असते. या प्रकरणात, जेव्हा कर विवरणपत्र भरले जाते, तेव्हा आर्थिक वर्षानंतरचे वर्ष मूल्यांकन वर्ष म्हणुन निवडले पाहिजे. उदाहरण, सध्याच्या कर भरण्यासाठी तुम्ही मूल्यांकन वर्ष 2023-24 निवडले पाहिजे.

सर्व स्त्रोतांच्या उत्पन्नाची माहिती न देणे

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. जरी तुम्ही पगारदार व्यक्ती असाल, तरीही तुम्हाला विविध स्त्रोतांकडून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

Income Tax Return
IT Return 2023: जास्त कर भरताय? आयकर कायद्यात कर वाचवण्याचे आहेत मार्ग, कोणते ते जाणून घ्या

नोकरी बदलाची माहिती

जर तुम्ही आर्थिक वर्षात नोकऱ्या बदलल्या असतील, तर ही माहिती दिली पाहिजे की तुम्ही तुमच्या सध्याच्या आणि पूर्वीच्या दोन्ही कंपन्यांकडून मिळालेले उत्पन्न तुमच्या ITR मध्ये उघड करावे.

भांडवली नफा आणि तोटा उघड करण्यात निष्काळजीपणा

आयटीआर सबमिट करताना अनेक कर फायलर्स भांडवली नफा आणि तोट्याचा तपशील वगळतात. या चुकीचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

टॅक्स स्लॅबबद्दल माहिती नसणे

रिटर्न फाइलिंग करताना, तुमच्या उत्पन्नाची आणि स्लॅबची अचूक माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येत आहात या आधारावर आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.

नोंद: आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

Income Tax Return
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.