ITC Dividend 2024 : ‘आयटीसी’तर्फे प्रतिशेअर ७.५० रुपये अंतिम लाभांश
Mumbai News : वैविध्यपूर्ण उद्योगांचा समूह असलेल्या आयटीसी कंपनीने मार्च २०२४ अखेरच्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात एक टक्का घसरण नोंदवत ५१२० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हेच प्रमाण ५१७५ कोटी रुपये होते.
जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक दोन टक्क्यांनी वाढून १९,४४६ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो १९,०५८ कोटी रुपये होता. कंपनीच्या संचालक मंडळाने मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिशेअर ७.५० रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारसही केली आहे.
अंतिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख चार जून निश्चित करण्यात आली असून, २९ ते ३१ जुलै दरम्यान लाभांश दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. विभागानुसार, मार्च तिमाहीत सिगारेट व्यवसायातील महसूल वार्षिक सात टक्क्यांनी वाढून ८६८९ कोटी झाला आहे, मागील वर्षीच्या तिमाहीत ८०९२ कोटी होता.
एफएमसीजी व्यवसायाने चौथ्या तिमाहीत ५३०८ कोटी रुपयांची कमाई केली असून, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४९५१ कोटी रुपयांपेक्षा ती सात टक्के अधिक आहे. या विभागाचा नफा पाच टक्क्यांनी घसरून ४८० कोटी रुपये झाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.