ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी; रिटर्न न भरल्यास काय परिणाम होणार?

ITR Filing Deadline 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची आज शेवटची संधी आहे. आयकर विभागाने कर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी 30 जुलै रोजी सांगितले की, आतापर्यंत 6 कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत.
ITR Filing
ITR Filing Deadline 2024Sakal
Updated on

ITR Filing Deadline 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची आज शेवटची संधी आहे. आयकर विभागाने कर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी 30 जुलै रोजी सांगितले की, आतापर्यंत 6 कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. जर तुम्ही विवरणपत्र भरले नसेल तर तुम्ही हे काम आजच पूर्ण करा.

31 जुलैपर्यंत रिटर्न भरले नाही तर काय होणार?

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर कोणत्याही करदात्याने या तारखेपर्यंत विवरणपत्र भरले नाही तर तो 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकतो. याला विलंबित आयकर रिटर्न म्हणतात. यासाठी त्याला दंड भरावा लागणार आहे.

याशिवाय कराच्या रकमेवर व्याजही भरावे लागणार आहे. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234F मध्ये विलंबित रिटर्नचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय कर भरल्यास त्यावर दरमहा 1 टक्के व्याजही भरावे लागेल.

ITR Filing
Post Office: ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम; 5 वर्षात मिळेल 12 लाखांपर्यंत व्याज

किती दंड भरावा लागणार?

कलम 234F नुसार, विलंबित रिटर्न भरण्याचा दंड करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित आहे. जर करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना विलंबित रिटर्न भरण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5,000 रुपये दंड भरावा लागेल.

ITR Filing
Wilful Defaulters: कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आरबीआय मोठी कारवाई करणार

इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर काय होईल?

रिटर्न न भरल्यास करदात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जो करदाता रिटर्न भरत नाही तो चालू मूल्यांकन वर्षाचा तोटा पुढे नेऊ शकणार नाही.

याशिवाय आयकर विभाग त्याच्यावर दंड ठोठावू शकतो. हा दंड कराच्या 50% ते 200% पर्यंत असू शकतो. जास्त उत्पन्न असणाऱ्या प्रकरणांमध्ये, रिटर्न न भरल्यास तुम्हाला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.