ITR Filing 2024: ITR भरण्यासाठी फक्त 1 दिवस शिल्लक, तारीख वाढवण्याची करदात्यांची मागणी, मुदत वाढवणार का?

ITR Filing Deadline: रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जर तुम्ही रिटर्न भरले नसेल तर लवकरात लवकर भरा, कारण ITR भरण्याची अंतिम मुदत संपणार आहे.
ITR Filing 2024
ITR Filing DeadlineSakal
Updated on

ITR Filing Deadline 2024: आयकर रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने मुदत वाढवावी अशी मागणी करदात्यांकडून केली जात आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सने (AIFTP) सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडे मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 ऑगस्टपर्यंत करण्याची मागणी केली आहे.

युनियनने म्हटले आहे की, देशातील अनेक भागात पूर आणि भूस्खलनासारख्या परिस्थितीमुळे करदात्यांना आयटीआर भरण्यात अडचणी येत आहेत. एआयएफटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण जैन आणि प्रत्यक्ष कर प्रतिनिधी समितीचे अध्यक्ष एसएम सुराणा यांनी महासंघाला लेखी अर्ज दिला आहे त्यात अर्जात सांगितले की, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांमध्ये खराब हवामानामुळे आयटीआर फाइल करणाऱ्यांना अडचणी येत आहेत.

मात्र, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जर तुम्ही रिटर्न भरले नसेल तर लवकरात लवकर भरा, कारण ITR भरण्याची अंतिम मुदत संपणार आहे.

31 जुलैपर्यंत करदाते दंडाशिवाय रिटर्न दाखल करू शकतात. अशा स्थितीत यासाठी आता एकच दिवस उरला आहे. प्राप्तिकर विभागही लोकांना वारंवार मुदतीच्या आत आयकर रिटर्न भरण्याचा सल्ला देत आहे. 31 जुलैनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला दंड द्यावा लागण्याची शक्यता आहे.

ITR Filing 2024
RBI Web Series: रिझर्व्ह बँकच्या प्रवासाला 90 वर्षे पूर्ण; वेब सिरीज करणार लॉन्च, काय असणार खास?

इतका भरावा लागेल दंड

31 जुलैनंतर आयकर रिटर्न भरण्यासाठी करदात्यांना किती दंड भरावा लागेल हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी रिटर्न उशीरा भरल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना कर म्हणून 5000 रुपये दंड भरावा लागेल.

तारीख वाढणार का?

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे, मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून यावर कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.

तज्ज्ञ सांगत आहेत की लोकांनी मुदतवाढ मिळण्याची वाट पाहू नये आणि लवकरात लवकर आयकर रिटर्न भरावा, तसे केले नाहीतर त्यांना दंड भरावा लागू शकतो.

ITR Filing 2024
SEBI: इनसायडर ट्रेडिंगचे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार, म्युच्युअल फंड उद्योगात होणार मोठा बदल

ट्विटरवर #IncomeTaxSiteIssues ट्रेंड

लोकांना आयकर फॉर्म डाऊनलोड होत नाही तसेच हा फॉर्म आयकर विभागाच्या 'ई-फायलिंग पोर्टल'वर जमा करण्यात अनेक अडचणी येत आहेत. सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या समस्यांसोबतच सेल्फ-असेसमेंट आणि टॅक्स पेमेंट पावती डाउनलोड करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे.

अशा परिस्थितीत सरकारने या सर्व परिस्थितीचा विचार करून आयटीआर भरण्याची मुदत वाढवायला हवी. आज सकाळी सोशल मीडिया X वर #IncomeTaxSiteIssues हॅशटॅग ट्रेंड करत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.