Income Tax Return: पॅनकार्ड निष्क्रिय झालंय? तरीही भरता येईल आयटीआर, आयकर विभागाने सांगितला मार्ग

ITR Filing: तुमच्याकडे पॅन कार्ड नसले तरीही तुम्ही आयटीआर दाखल करू शकता.
Income Tax Return
Income Tax ReturnSakal
Updated on

Income Tax Department: जर तुम्ही 30 जून 2023 पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल किंवा विसरला असाल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. अशा स्थितीत आयकर विभागाने माहिती दिली आहे की, तुमच्याकडे पॅन कार्ड नसले तरीही तुम्ही आयटीआर दाखल करू शकता. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्यानंतर दंडासह आयटीआर भरण्याची परवानगी दिली जाईल.

आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की, आधार पॅनशी लिंक नसताना किंवा पॅन निष्क्रिय असतानाही आयकर रिटर्न भरता येतो.

निष्क्रिय पॅन कार्डसह ITR कसा दाखल करावा

तज्ज्ञांच्या मते, आयटीआर ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर फाइल करताना पॅन आधारशी लिंक असणे गरजेचं नाही. याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल तरीही, ITR ई-फायलिंग पोर्टलवर तुम्हाला कोणत्याही वेळीआयकर रिटर्न भरता येईल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पॅन निष्क्रिय असले तरी ITR भरण्याच्या प्रक्रियेत कोणताही फरक पडत नाही. आयकर ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करता येते. लॉग इन केल्यानंतर, प्रथम ई-फाइलवर जा आणि नंतर आयकर रिटर्नवर जा, त्यानंतर तुम्ही आयटीआर भरण्याची प्रक्रिया सुरू करू शकता.

Income Tax Return
Income Tax Notice: आयकर विभाग पगारदारांना पाठवत आहे नोटीस, तुम्ही पण केलीय 'ही' चूक!

30 दिवसांच्या आत पडताळणी करणे आवश्यक आहे

जर तुम्ही रिटर्न भरले असेल तर आयटीआरची पडताळणी करणे अनिवार्य आहे. आयकर विभागाचा कायदा आयटीआर दाखल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत पडताळणी करण्यास परवानगी देतो. जर 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी झाली नाही, तर तुमचे आयकर रिटर्न भरलेले मानले जाणार नाही.

Income Tax Return
Income Tax: 5 लाखांपेक्षा कमी पगार असला तरीही भरावा लागेल ITR, जाणून घ्या नियम नाहीतर भरावा लागेल दंड

OTP ने आधार व्हेरिफाय केला जाणार नाही

जर पॅन कार्ड निष्क्रिय असेल आणि आयटीआर दाखल केला असेल, तर तुम्ही ते आधार ओटीपीद्वारे व्हेरिफाय करू शकत नाही, कारण तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नाही.

आयटीआर व्हेरिफायसाठी सीपीसी आयटीआर V ची स्वाक्षरी केलेली प्रत पाठवणे किंवा नेट बँकिंग, एटीएम इत्यादीद्वारे पडताळणी करणे यासारख्या इतर पडताळणी पद्धती वापरू शकतात.

Income Tax Return
Income Tax Return: उरलेत शेवटचे दोन दिवस, नाहीतर भरावा लागणार 5,000 रुपयांचा दंड, असा भरा 15 मिनिटांत ITR

परतावा मिळणार नाही

कर तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल, तर तुम्ही आयटीआर फाइल करू शकता, परंतु तुम्ही रिफंडसाठी पात्र राहणार नाही. याचा अर्थ कर विभागाकडून परतावा आणि कर परताव्यावरील व्याज दिले जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.