Income Tax Refund: काय शेठ ITR भरला तरी रिफंड आला नाही? तुम्हाला पैसे मिळतील की नाही? नेमका लोचा काय?

Eligibility criteria for income tax refund : सरकारी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, 100 रुपयांपेक्षा कमी रिफंड जमा करण्याचा नियम नाही. हे भविष्यकालीन इन्कम टॅक्स रिफंडमध्ये समाविष्ठ केले जाते.
income tax refund
income tax refundesakal
Updated on

सर्व करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करणे आवश्यक आहे. वित्तीय वर्ष 2024-25 साठी ITR फाइल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै जवळ येत आहे. अनेक लोकांनी आधीच आपले ITR भरले आहेत आणि काही लोक अजूनही अर्ज भरत आहेत. तर काहीजण रिफंडची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, ITR फाइलिंग केल्यानंतरही सर्वांनाच रिफंड मिळत नाही. चला, जाणून घेऊयात कोणाला ITR फाइलिंग केल्यानंतर रिफंड का मिळत नाही?

रिफंड कधी मिळतो?-

आपण ITR फाइल केल्यानंतर लक्षात येते की आपण जास्त कर भरला आहे किंवा जास्त TDS कापला गेला आहे. अशा परिस्थितीत ITR फाइल करताना तुम्ही जास्त कापलेला कराचा रिफंड क्लेम करू शकता. ITR फाइल केल्यानंतर  इन्कम टॅक्स विभाग तुमच्या फॉर्मची तपासणी करतो आणि मग तुमचा रिफंड प्रोसेस करतो.

रिफंड आता थेट तुमच्या पॅनशी लिंक असलेल्या बँक खात्यात येतो. पण, रिफंड मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे.  इन्कम टॅक्स विभागानुसार, करदात्यांनी आपले बँक खाते ई-फाइलिंग पोर्टलवर जोडावे किंवा आपल्या विद्यमान बँक खात्याची माहिती अपडेट करावी आणि ते व्हेरिफाय करावे.

income tax refund
Supreme Court: आरक्षण मर्यादेबाबत हायकोर्टाचा निर्णय कायम, मात्र एक आशेचा किरण; सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?

कोणाला रिफंड मिळत नाही?-

रिफंड मिळण्यासाठी काही मर्यादा आहेत. जर तुमचा कर क्लेम त्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर रिफंड मिळत नाही. इनकम टॅक्स विभागाच्या नियमांनुसार, जर तुमच्या रिफंडची रक्कम 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होत नाही. मात्र, ही रक्कम तुम्हाला कधीच मिळत नाही असे नाही. 100 रुपयांपर्यंतची रक्कम सुरुवातीला सरकारी खात्यात ठेवली जाते आणि पुढील वेळी जेव्हा रिफंड मिळेल, तेव्हा ती रक्कम तुम्हाला देण्यात येते.

नियम काय आहेत?-

सरकारी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, 100 रुपयांपेक्षा कमी रिफंड जमा करण्याचा नियम नाही. हे भविष्यकालीन इन्कम टॅक्स रिफंडमध्ये समाविष्ठ केले जाते. नियमांनुसार, 100 रुपयांपेक्षा कमी रिफंड प्रोसेस होत नाही आणि इनकम टॅक्स विभाग ते करदात्याच्या खात्यात जमा करत नाही. रिफंडसंबंधी इन्कम टॅक्स विभाग करदात्याला इंटिमेशन नोटीसद्वारे माहिती देतो. ही नोटिस इनकम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 143(1) अंतर्गत पाठवली जाते. ITR भरण्याचे आणि व्हेरिफाय केल्यानंतर इनकम टॅक्स विभाग ही नोटिस करदात्याला पाठवतो.

income tax refund
Income Tax Refund: आता AI द्वारे ITR तपासले जाणार, कर परतावा मिळण्यास होणार उशीर? CAच्या दाव्याने खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.