Gold Silver Rate: सोन्याला ‘सोन्याचे दिन’, तर भाववाढीने चांदीचीही ‘चांदी’! 2 वर्षांत सोने 20, तर चांदीच्या भावात 30 हजारांची वाढ

Latest Jalgaon Gold Silver Market News : गेल्या दोन-तीन वर्षांत जागतिक युद्धजन्य स्थिती, अमेरिकेतील बँकांनी कमी केलेले व्याजदर यांसारखी कारणे या भाववाढीमागे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यातही ही भाववाढ अशीच राहील.
Gold Price Hike
Gold Price Sakal
Updated on

जळगाव : गुंतवणूकदारांना मोठा परतावा देणाऱ्या सोन्याचे भाव गेल्या दोन वर्षांत तब्बल २० हजारांनी वाढले, तर चांदीच्या भावानेही ३० हजारांची घसघशीत वाढ अनुभवली आहे. जानेवारी २०२३ मध्ये ५७ हजार रुपये भाव असलेल्या सोन्याचा प्रतिदहा ग्रॅमचा भाव ८० हजारांवर पोहोचला आहे, तर चांदीनेही प्रतिकिलो ६९ हजारांवरून थेट लाखाची झेप घेतलीय. (gold silver price increase)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.