Jan Dhan Yojana: जन धन खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे, शून्य शिल्लक खात्यासह मिळतात 'हे' फायदे

Jan Dhan Yojana: जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली 67 टक्के खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत.
Jan Dhan Yojana
Jan Dhan YojanaSakal
Updated on

Jan Dhan Yojana: देशभरातील जनधन खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे. मोठी बाब म्हणजे यातील 56 टक्के खाती महिलांनी उघडली आहेत. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली. जन धन खात्यांतर्गत, बँकांद्वारे शून्य शिल्लक असलेली खाती उघडली जातात.

ज्यामध्ये खातेदारांना डेबिट कार्डसह ओव्हरड्राफ्ट सारख्या सुविधा दिल्या जातात. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली 67 टक्के खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहेत.

2.03 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी

जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा आहेत आणि या खात्यांवर 34 कोटी रुपये डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांमधील सरासरी शिल्लक रुपये 4,076 आहे. यामध्ये 5.5 कोटी खात्यांना डीबीटीचा लाभ मिळत आहे.

Jan Dhan Yojana
Tax on Gifted Stocks: तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर्स गिफ्ट केलेत का? तर भरावा लागेल टॅक्स, काय आहे नियम?

ही योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती

केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. याद्वारे सरकार दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणावर बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात यशस्वी ठरले आहे.

प्रधानमंत्री जन धन योजनेमुळेच DBT च्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात सरकारला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, गेल्या नऊ वर्षांत सरकार डीबीटीच्या माध्यमातून 2.73 लाख कोटी रुपये वाचवण्यात यशस्वी झाले आहे.

Jan Dhan Yojana
Bank Loan Rates Hike: ग्राहकांना मोठा धक्का! आणखी एका बँकेने कर्ज केले महाग

जन धन खात्याचे अनेक फायदे

मोफत रुपे डेबिट कार्ड प्रधानमंत्री जन धन खात्यामध्ये शून्य शिल्लक खात्यासह दिले जाते. या डेबिट कार्डसोबत 2 लाख रुपयांचा अपघात विमाही उपलब्ध आहे. याशिवाय 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधाही उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.