Japan New Note: 20 वर्षांनंतर जपानने घेतला मोठा निर्णय; देशाची सर्वत्र होतेय चर्चा

Japan New Banknotes: जपानमध्ये 20 वर्षांत प्रथमच नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. देशात जारी करण्यात आलेल्या या नवीन बँक नोटा 10,000 येन, 5,000 येन आणि 1,000 येनच्या असून त्या विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
Japan New Note
Japan New NoteSakal
Updated on

Japan New Banknotes: जपानमध्ये 20 वर्षांत प्रथमच नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. देशात जारी करण्यात आलेल्या या नवीन बँक नोटा 10,000 येन, 5,000 येन आणि 1,000 येनच्या असून त्या विशेष तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. बनावट नोटांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जपानमध्ये या 3D होलोग्राम नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

बँक ऑफ जपानने बुधवारी 3-डी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाइन केलेल्या नवीन नोटा जारी केल्या. पंतप्रधान फुमियो किशिदा (जपान पीएम) यांनी 10,000 येन, 5,000 येन आणि 1,000 येनच्या नवीन नोटांचे कौतुक केले आणि ते ऐतिहासिक असल्याचे म्हटले.

Japan New Note
Nithin Kamath: सेबीच्या नव्या नियमांमुळे शेअर बाजाराची व्यवस्थाच बदलणार, शून्य ब्रोकरेजचे युग संपणार?

3D होलोग्रामची वैशिष्ट्ये

जपानच्या नॅशनल प्रिंटिंग ब्युरोने पेपर नोट्ससाठी एक अनोखे तंत्रज्ञान वापरले आहे. जपानची अर्थव्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नात सरकार रोख रकमेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानके, पार्किंग लॉट आणि दुकाने देखील नवीन नोटांशी जुळवून घेण्यासाठी पेमेंट मशीन अपग्रेड करत आहेत. 10,000 येनच्या नोटेवर जपानी भांडवलशाहीचे जनक मानले जाणारे ईइची शिबुसावा यांचा फोटो आहे.

5,000 येनच्या नोटेवर उमेको त्सुदा या स्त्रीवादी आणि शिक्षिकेचा फोटो आहे. त्याचप्रमाणे, 1,000 येनच्या नोटेवर टिटॅनस आणि बुबोनिक प्लेगच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर शिबासाबुरो किटासाटो यांचा फोटो आहे.

Japan New Note
Tata Group: टाटा अमरावतीमध्ये उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

किती नोटा छापल्या जातील?

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 7.5 अब्ज नव्या डिझाईन केलेल्या नोटा छापण्याची जपानची योजना आहे. सर्वसामान्यांना नव्या नोटा मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. प्रथम या नोटा बँका आणि इतर वित्तीय संस्थांना दिल्या जातील. त्यानंतर, हे एटीएम आणि दुकानांमध्ये वितरित केल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.