Cummin Price: शेतकरी चिंतेत! जिऱ्याचे भाव 50 टक्क्यांनी घसरले; काय आहे कारण?

Cummin Price: मसाल्याच्या पदार्थांमधील महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरा. आज त्याची चर्चा होत आहे कारण या रब्बी हंगामात जिऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी जिऱ्याच्या भावात मोठी वाढ झाली होती त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घेतले.
Jeera prices fall 50 per cent amid bumper crop prospects
Jeera prices fall 50 per cent amid bumper crop prospects Sakal
Updated on

Cummin Price: मसाल्याच्या पदार्थांमधील महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरा. आज त्याची चर्चा होत आहे कारण या रब्बी हंगामात जिऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी जिऱ्याच्या भावात मोठी वाढ झाली होती त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन घेतले.

गुजरात आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांनी यावेळी मोठे उत्पादन घेतले आहे. गुजरातमध्ये 160 टक्के अधिक आणि राजस्थानमध्ये 25 टक्के अधिक उत्पादन झाले आहे. यावर्षी जिऱ्याचे क्षेत्र 9 लाख हेक्‍टरवरून 38 टक्‍क्‍यांनी वाढून 12.50 लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे.

आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये जिऱ्याचे उत्पादन सुमारे 9.12 लाख टन होते. गेल्या तिमाहीत त्याच्या भावात घसरण झाली असली तरी जिऱ्याखालील क्षेत्र वाढतच आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मागणी जास्त आणि पुरवठ्याअभावी अलीकडे जिऱ्याच्या भावात वाढ झाली होती. मात्र आता उत्पादन वाढल्यामुळे भाव खाली आले आहेत. त्याची किंमत 50 हजार रुपये प्रति क्विंटलवरून 30 हजार रुपये प्रति क्विंटल झाली आहे.

Jeera prices fall 50 per cent amid bumper crop prospects
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता

व्यापाराचे केंद्र असलेल्या उंझा (गुजरात) येथे ऑक्टोबरमध्ये जिऱ्याची सरासरी किंमत ऑक्टोबरमध्ये 600 रुपये/किलोवरून 50% कमी होऊन 300 रुपये/किलो झाली आहे. भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी जास्त उत्पन्नामुळे, या हंगामात (2023-24) राजस्थान आणि गुजरातमध्ये सुमारे 12 दशलक्ष हेक्टरमध्ये जिऱ्याची पेरणी झाली आहे, तर मागील हंगामात केवळ 0.9 दशलक्ष हेक्टर लागवडीखाली होते.

“गेल्या काही महिन्यांत लागवडीखाली जास्त क्षेत्र आणि अनुकूल हवामानामुळे जास्त पीक येण्याचा अंदाज असल्याने भाव आणखी घसरण्याची अपेक्षा आहे,” असे दिनेश पटेल, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), उंझा, गुजरात यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले.

Jeera prices fall 50 per cent amid bumper crop prospects
Upcoming IPO: ‘आयपीओं’ची पुन्हा बरसात! आठवड्यात सहा कंपन्या दाखल होणार

पटेल म्हणाले की, जिऱ्याच्या किंमती पुढील महिन्यापर्यंत 250 रुपये/किलोपर्यंत घसरण्याची शक्यता आहे आणि पुढील काही महिन्यांत त्याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. जिऱ्याच्या किंमती कमी झाल्याने मसाल्यांमधील महागाई कमी होण्याची शक्यता आहे, जी गेल्या महिन्यात 19.69 % होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()