Share Market: 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज

Share Market: निवडणूक निकालाचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो
Share Market: 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज
Updated on

Share Market: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक आहेत. निवडणुकीचे निकाल काय लागतील? सत्तापरिवर्तन होणार की नाही? स्थिर सरकार येणार की नाही? या सर्व गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो.

यातच आता अमेरिकन गुंतवणूक बँक जेफरीज एलएलसीकडून एक अंदाज व्यक्त केला आहे. जेफरीज एलएलसीच्या इक्विटी स्ट्रॅटेजीचे ग्लोबल हेड ख्रिस वुड यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आला नाही, तर भारतातील इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण होईल.

शेअर बाजार 25 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

ख्रिस वुड म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला नाही तर भारतीय शेअर बाजारात 25 टक्क्यांनी घसरण होऊ शकते. वुड म्हणाले की, मोदी सरकारने जागतिक पुरवठा साखळीला आकर्षित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. ख्रिस वुडने बिझनेस स्टँडर्डच्या एका इव्हेंटमध्ये असे भाष्य केले आहे.

Share Market: 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज
RBI Governor: खाजगी बँकांमधील नोकऱ्या सोडण्याच्या प्रमाणात झाली वाढ; RBIने व्यक्त केली चिंता

2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या पराभवानंतर शेअर बाजारात पुढच्या 2 दिवसांत 20 टक्क्यांची घसरण झाली होती.

मात्र, तत्कालीन काँग्रेस सरकारने दक्षिण आशियाई अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी तयार केलेली धोरणे कायम ठेवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पहिल्या 2 दिवसांचे नुकसान काही प्रमाणात सावरण्यात बाजाराला यश आले होते.

इस्राइल-हमास संघर्षामुळे काय परिणाम होईल?

इस्राइल-हमास संघर्षावर चर्चा करताना वुड म्हणाले की, हा संघर्ष मध्यपूर्वेतील व्यापक युद्धात रूपांतरित होणार नाही असे बाजार गृहीत धरत आहे. तेलाच्या किंमतीतील मर्यादित चढ-उतारांवरून हे स्पष्ट होत आहे.

Share Market: 2024 मध्ये मोदी सत्तेवर आले नाही तर शेअर बाजारात 25 टक्के घसरण होईल; जेफरीजचा अंदाज
जुलै-सप्टेंबरमध्ये सोन्याच्या मागणीत 10 टक्के वाढ, किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदी

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.