Supreme Court Jet Airways: सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश दिले आहेत. NCLATने जेट एअरवेजची मालकी जालान-कॅलरॉक कन्सोर्टियम (JKC) कडे सोपवण्याचा निर्णय दिला होता, त्यानंतर SBI आणि इतर कर्जदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने संपत्ती विकण्याचा अंतिम निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर लाखो किरकोळ भागधारकांचे पैसे या कंपनीच्या शेअर्समध्ये अडकल्याने ते अडचणीत आले आहेत.