Strongest Brand: जिओ बनला देशाचा नंबर वन ब्रँड, जाणून घ्या जागतिक स्तरावर काय आहे रँकिंग?

Strongest Brand of 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना मागे टाकून रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी जिओ 2024 मधील भारतातील सर्वात मोठी ब्रँड बनली आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Jio continues to remain country's strongest brand for 2024 Report
Jio continues to remain country's strongest brand for 2024 Report Sakal
Updated on

Strongest Brand of 2024: स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी जिओ 2024 मधील भारतातील सर्वात मोठी ब्रँड कंपनी बनली आहे. ब्रँड फायनान्सने जारी केलेल्या ‘ग्लोबल-500 2024’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत Jio 17व्या स्थानावर आहे. WeChat, YouTube, Google, Deloitte, Coca-Cola आणि Netflix या यादीत अव्वल आहेत. या यादीत LIC 23व्या स्थानावर आहे, त्यानंतर SBI 24व्या स्थानावर आहे.

अहवालात म्हटले आहे की, “तुलनेने जिओ हा टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मजबूत ब्रँड म्हणून उदयास आला आहे. "त्याचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स स्कोअर 89.0 आणि संबंधित AAA ब्रँड रेटिंग देखील आहे, त्याचे ब्रँड मूल्य 6.1 अब्ज डॉलर पर्यंत वाढले आहे."

‘ग्लोबल-500 2024’ अहवाल
‘ग्लोबल-500 2024’ अहवालSakal

5G सेवेच्या बाबतीतही रिलायन्स जिओने जास्तीत जास्त स्पेक्ट्रम खरेदी करून स्पर्धेतील इतर कंपन्यांना आधीच मागे टाकले आहे. आता ही कंपनी सतत नवीन शहरांमध्ये 5G सेवा सुरू करत आहे.

Jio continues to remain country's strongest brand for 2024 Report
RBI: विकासदर सात टक्के राहण्याची शक्यता; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे दावोस येथे प्रतिपादन

अलीकडेच रिलायन्स जिओने देशातील 6 शहरांमध्ये बीटा ट्रायल सुरू केली आहे. या शहरांमध्ये वाराणसी, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि नाथद्वाराचा समावेश आहे. यानंतर जिओने आपली 5G सेवेचा विस्तार केला आहे. तसेच बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये देखील प्रवेश केला आहे.

40 कोटींहून अधिक ग्राहकांसह रिलायन्स जिओ भारतातील सर्वात मोठी मोबाइल नेटवर्क ऑपरेटर कंपनी आहे. जिओने भारतीय बाजारपेठेतील करोडो ग्राहकांना परवडणारे 4G नेटवर्क आणले. जिओने भारतीयांच्या डेटा वापरण्याच्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.