TCS Job Scam: लाच घेतल्याप्रकरणी TCS ची मोठी कारवाई, 6 कर्मचाऱ्यांचे निलंबन अन् 6 जॉब पोर्टलवर घातली बंदी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने लाच घेऊन भरती घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे.
TCS Job Scam
TCS Job ScamSakal
Updated on

TCS Job Scam: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने लाच घेऊन भरती घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे. टीसीएसने 6 कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. याशिवाय सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कंपनीने प्रथमच या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणाबाबत अनेक प्रकारची चर्चा होती.

भागधारकांशी बोलताना एन चंद्रशेखरन म्हणाले की, आम्हाला सहा कर्मचारी आढळले ज्यांचे वर्तन नैतिकतेच्या विरुद्ध होते. एन चंद्रशेखरन म्हणाले की त्या सर्व सहा कर्मचारी आणि अशा सहा व्यावसायिक सहयोगी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. आणखी तीन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

एन चंद्रशेखरन म्हणाले की, कंपनी अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ते म्हणाले की, प्रत्येक कर्मचाऱ्याचे आचरण नैतिक असावे आणि वागण्यात सचोटी असावी, ही सर्व प्रथम कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अपेक्षा असते.

TCS Job Scam
Adani Group Stock: 4,000 चा शेअर आला 656 रुपयांवर; अदानी समूहाच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार कंगाल

अशा परिस्थितीत, जर कोणत्याही कर्मचाऱ्याकडून नैतिक वर्तनाचे उल्लंघन होत असेल तर ते मला आणि सर्व वरिष्ठांना दुखावते आणि आम्ही ते अत्यंत गांभीर्याने घेऊ आणि कठोर कारवाई करू.

लाईव्ह मिंटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होत. एका व्हिसलब्लोअरने या घोटाळ्याचा खुलासा केला होता. या कर्मचाऱ्याने थेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (TCS CEO) आणि सीओओ यांना पत्र लिहित या घोटाळ्याची माहिती दिली.

या पत्रामध्ये त्याने कंपनीच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती यांचं नावही घेतलं होत. व्हिसलब्लोअरने आपल्या पत्रात असे आरोप केले आहेत, की टीसीएसमध्ये नोकरी देण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग कंपन्यांकडून कमिशन घेतलं होतं.

यात ईएस चक्रवर्ती यांचं नाव समोर आलं आहे. या अधिकाऱ्यांनी कमीत कमी 100 कोटी रुपयांचं कमिशन घेतल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

TCS Job Scam
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.