Success Story: रस्त्यावरचा गुंड असा बनला अब्जाधीश

Success Story: जॉनने आपली सगळी संपत्ती समाजासाठी देण्याचे ठरवले आहे.
Success Story
Success StorySakal
Updated on

: डाॅ. प्रिया दंडगे

Success Story: ‘तुमच्यामध्ये प्रयत्न करण्याची अविरत इच्छा असेल, तर तुम्ही यशस्वी होवू शकता.’’ प्रयत्न हेच भांडवल समजून यशस्वी उद्योजक होणाऱ्या जॉन पॉल देजोरियाचे हे म्हणणे आहे. अब्जावधी रुपयांचा उद्योग उभा करूनही आपला दातृत्वाचा झरा कधीच आटु न देणारा जॉन अगदी शून्यातून इथवर येऊन पोहोचला आहे.

जॉन पॉल देजोरिया ही केसांची सौंदर्य प्रसाधने बनवणारी कंपनी आहे. जॉनचे आई-वडील अमेरिकेमध्ये निर्वासित म्हणून आले. वडील लवकर वारल्याने आई छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मुलांना मोठे करत होती. परंतु तिला ते शक्य होईना तेव्हा तिने जॉनला फॉस्टर केअरमध्ये पाठवले. वयाच्या नऊ वर्षापर्यंत तो तिथे राहिला.

त्यानंतर आपल्या मोठ्या भावाबरोबर तो पैसे मिळवण्यासाठी आईला मदत करू लागला. तो रोज सकाळी पेपर टाकत असे. नवीन ग्राहक आणल्यास त्याला एक डॉलर मिळत असे. आपली चिकाटी न सोडता जॉन लोकांशी बोलत असे. यातूनच त्याला लोकांशी कसे बोलायचे, लोकांना काय हवे आहे, हे कळले. पुढे तो घरोघरी फिरून एनसायक्लोपीडिया विकू लागला.

जॉन तरुण असताना रस्त्यावरच्या टोळीचा सदस्य होता, परंतु जेव्हा त्याच्या शाळेच्या गणिताच्या शिक्षकाने त्याला समजावून सांगितले तेव्हा त्याने बदलण्याचा निर्णय घेतला.

प्रत्येक घरी सारख्याच उत्साहाने तो एनसायक्लोपीडिया विकायला जात असे. कोणी दारावर उभे करून घेत नसे, तर कुणी तोंडावर दार लावत असे. पण तरीही जॉनने कधीही आपला उत्साहाचा आलेख कमी केला नाही. पुढे एका हेअर केअर कंपनीमध्ये तो नोकरीला लागला. तिथून काढून टाकल्यावर जॉनने आपल्या मित्रासोबत केसांसाठी उत्पादने बनवणारी कंपनी सुरू केली.

दोघांकडे मिळून भांडवल होते अवघे 700 डॉलर्स. सुरुवातीला आपले उत्पादन ग्राहकांना चांगले आहे, हे पटवून द्यायला त्याला खूप वेळ लागला. परंतु त्याच्या उत्पादनांची गुणवत्ता अतिशय चांगली असल्यामुळे हळूहळू ते लोकप्रिय झाले.

Success Story
UPI Transaction: UPI युजर्सच्या संख्येत वाढ, सलग तिसऱ्या महिन्यात 1,000 कोटींहून अधिक व्यवहार

आज जॉन पॉल हा मोठा ब्रँड आहे. अब्जावधींची कमाई करतो आहे. या सर्वाचे श्रेय जॉनच्या चिकाटीला आहे. जेव्हा शंभर लोक तुमच्या तोंडावर दार बंद करत असतात तेव्हा 101व्या माणसाकडे त्याच उत्साहाने आणि चेहऱ्यावर हसू घेऊन तुम्ही जाऊ शकला, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता, असे जॉन सांगत असतो.

व्यवस्थापन क्षेत्रात त्याला एमबीए करणाऱ्या मुलांना व्याख्यान देण्यासाठी बोलावले जाते, तेव्हा तो हेच सांगतो, तुमचे उत्पादन मात्र अप्रतिम गुणवत्तेचे असावे लागते, तरच हे शक्य होते!

Success Story
ITR Filing: आयटीआर फाइलिंगचा नवा विक्रम, 31 ऑक्टोबरपर्यंत भरले 7.85 कोटी रिटर्न

जॉनने आपल्या व्यवसायामध्ये अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या. सुरुवातीला त्यांच्याकडे जाहिरातीसाठी पैसे नव्हते, मग ते सलोन वाल्यांना आपली उत्पादने वापरायला सांगत. तुम्ही आमची उत्पादने वापरली तर आम्ही तुमच्याकडे कस्टमर पाठवू, असे सांगितल्यानंतर त्यांच्या उत्पादनाचा खप वाढला.

जॉनने आपली सगळी संपत्ती समाजासाठी देण्याचे ठरवले आहे. तो रोज आठ हजार एचआयव्ही बाधित मुलांना जेऊ घालतो. दक्षिण आफ्रिकेतील एचआईवी बाधित मुलांसाठी किंवा ज्यांचे पालक एचआईवी मुळे दगावले आहेत, अशा मुलांसाठी तो शिक्षण- जेवण- राहणे याची सोय करतो.

जगातील अशा दुर्गम भागात की जिथे कुपोषण आहे, त्याने खते शेतीची अवजारे बी बियाणे लोकांना दिली आहेत. लोकांनी आपल्या परसदारी भाजी उगवून खावी, तरच त्यांचे कुपोषण कमी होईल, असे जॉनचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.