JP Morgan Upgrades India: इन्व्हेस्टमेंट बँकर आणि ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने भारताला अपग्रेड केले आहे. ग्लोबल बँकेने भारताला 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट' केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सकारात्मक वातावरण, इमर्जिंग मार्केट्स (EM), GDP मधील वाढ आणि बॉन्ड मार्केट सुधारणे या अनेक कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने भारताला अपग्रेड केले गेले आहे.यापूर्वी मॉर्गन स्टॅनली, सीएलएसए आणि नोमुरा यांनीही भारताला अपग्रेड केले आहे.
या 3 मोठ्या शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश
ब्रोकरेज हाऊसने तीन शेअर्सचा EM मॉडेल पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे. यात सन फार्मा, बँक ऑफ बडोदा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांची नावे आहेत.
याआधी, मॉर्गन स्टॅन्लेने आर्थिक आणि कमाईच्या वाढीतील सुधारणांमुळे भारताचे रेटिंग ओव्हरवेटवर अपग्रेड केले होते. CLSA ने भारतातील पोर्टफोलिओ 20 टक्क्यांनी वाढवले आहेत.
जेपी मॉर्गनने गेल्या महिन्यात भारताचा जून 2024 पासून इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स (GBI-EM) मध्ये समावेश करणार आहे. या निर्णयानंतर जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सचा ओघ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परदेशी गुंतवणूकदार भारताबद्दल उत्साही दिसतात कारण देशाची आर्थिक वाढ अनेक प्रतिस्पर्धी देशांच्या पुढे आहे. भारताचा भू-राजकीय प्रभाव वाढत आहे आणि Apple Inc.सह अनेक जागतिक कंपन्या चीनला पर्याय शोधत आहेत, म्हणजेच त्यांना चीन सोडून दुसऱ्या देशात जायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.