जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बाँड इंडेक्समध्ये भारत; भारतीय बाँड मार्केट आणि रुपयावर काय परिणाम होणार?

JP Morgan index: भारतीय बाजारांसाठी एक मोठी बातमी आहे.
JPMorgan to include India in its emerging market debt index, paving the way for billions in inflows
JPMorgan to include India in its emerging market debt index, paving the way for billions in inflows Sakal
Updated on

JP Morgan index: भारतीय बाजारांसाठी एक मोठी बातमी आहे. जवळपास 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, भारत उदयोन्मुख बाजारपेठांसाठी जागतिक बाँड निर्देशांकात आपले स्थान निर्माण करणार आहे.

जेपी मॉर्गनने शुक्रवारी (22 सप्टेंबर) सांगितले की, भारताचा जून 2024 पासून इमर्जिंग मार्केट डेट इंडेक्स (जीबीआय-ईएम) मध्ये समावेश केला जाईल. या निर्णयानंतर जगातील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाढ होत आहे. भारताचा भू-राजकीय प्रभाव वाढत आहे आणि ऍपलसह जागतिक कंपन्या चीनला पर्याय शोधत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारतात गुंतवणूक करण्याचा ओघ वाढणार आहे.

जागतिक रोखे निर्देशांकात भारतीय रोख्यांचा समावेश झाल्यामुळे भारतीय बाजारात गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय डायरेक्टच्या मते, पुढील 6-8 महिन्यांत भारतीय रोखे बाजारात 40-50 अब्ज रुपयांची वाढ होऊ शकते.

HSBC होल्डिंग्सचा असा विश्वास आहे की यामुळे भारतात 30 अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते. त्याच वेळी, आणखी एक अंदाज असा आहे की पुढील 10 महिन्यांत 20-22 अब्ज डॉलर भारतीय रोखे बाजारात येऊ शकतात.

JPMorgan to include India in its emerging market debt index, paving the way for billions in inflows
Glenmark Pharma: निरमा ग्रुपने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीचा 75 टक्के हिस्सा घेतला विकत, काय झाली डील?

जागतिक रोखे निर्देशांकात भारतीय रोख्यांचा समावेश केल्यास सरकारी कर्ज घेण्याचा पर्याय निर्माण होईल. याशिवाय कॉर्पोरेट बाँड जारी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी असेल. याशिवाय, भारतीय रोखे बाजारात अब्जावधी डॉलर्सची वाढ भारतीय रुपयाला आधार देईल आणि तो मजबूत होऊ शकेल.

JPMorgan to include India in its emerging market debt index, paving the way for billions in inflows
Canada-India Row: गुंतवणूकदारांना मोठा झटका! भारत कॅनडा वादात महिंद्राने कॅनडामधील व्यवसाय केला बंद

भारताच्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संकेत मिळत होते. तसेच रशिया युक्रेनच्या संकटामुळे आणि चीनमधील मंदीमुळे गुंतवणुकदारांची वाढती चिंता यामुळे या यादीत भारताचाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.