Lottery Ticket: बाईपण भारी देवा! 11 जणींनी 25 रुपये गोळा करुन काढली लॉटरी, लागला 10 कोटींचा जॅकपॉट

महिलांकडे काही आठवड्यांपूर्वी लॉटरीची तिकिटे घेण्यासाठी पैसे नव्हते आता त्या करोडपती झाल्या आहेत.
Lottery Ticket
Lottery TicketSakal
Updated on

Lottery Ticket: केरळमध्ये उधार घेतलेल्या पैशातून 11 महिला रातोरात करोडपती झाल्या आहेत. या महिलांकडे काही आठवड्यांपूर्वी लॉटरीची तिकिटे घेण्यासाठी 250 रुपयेही नव्हते आणि आता त्यांना 10 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

काही आठवड्यांपूर्वी जेव्हा महिलांनी 250 रुपये किंमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या पर्समध्ये 25 रुपयेही नव्हते.

त्यांच्यापैकी एकीने आपले नशीब आजमावण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून थोडी रक्कम उधारही घेतली. या 11 महिला केरळच्या परप्पनगडी नगरपालिकेच्या अंतर्गत हरित सेनेमध्ये कचरा वेचण्याचे काम करतात.

या महिलांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की त्या करोडपती होतील. बुधवारी झालेल्या ड्रॉ नंतर केरळ लॉटरी विभागाने त्यांना 10 कोटी रुपयांच्या मान्सून बंपर विजेता म्हणुन घोषित केले आहे.

Lottery Ticket
RBI Fact Check: 'ते' चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा बनावट आहेत का? रिझर्व्ह बँकेनं दिलं स्पष्टीकरण

सहकाऱ्यांकडून पैसे गोळा करून तिकीट घेतलेली राधा म्हणाली, 'आम्ही आधी पैसे जमवून लॉटरीचे तिकिट घेतले. दुसर्‍या महिलेने सांगितले की निकालाची ती आतुरतेने वाट पाहत होती, परंतु जेव्हा कोणीतरी तिला सांगितले की शेजारच्या पलक्कड येथे राहणाऱ्या महिलेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे तेव्हा ती नाराज झाली होती.

ती म्हणाली, 'जेव्हा शेवटी कळले की आम्हाला जॅकपॉट मिळाला आहे, तेव्हा उत्साह आणि आनंदाला थारा नव्हती. आपण सर्वजण जीवनात अनेक अडचणींचा सामना करत आहोत आणि पैशांमुळे आपल्या समस्या काही प्रमाणात कमी होतात.

Lottery Ticket
Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

महिलांना उदरनिर्वाह करणे कठीण जाते आणि त्यांना हरितकर्म सेनेचे सदस्य म्हणून मिळणारे तुटपुंजे वेतन हे त्यांच्या कुटुंबासाठी एकमेव उत्पन्न आहे.

हरिता कर्म सेना घरांमधून नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा उचलते. नगरपालिकेतील हरित कर्म सेना संघाच्या अध्यक्षा शीजा म्हणाल्या की, यावेळी नशिबाने महिलांना साथ दिली आहे.

Lottery Ticket
UPI Payment : रूपे क्रेडिट कार्डाद्वारे येस बँकेची यूपीआय सुविधा

त्या म्हणाल्या, 'अनेकांना कर्ज फेडावे लागते... मुलींची लग्ने करावी लागतात... किंवा त्यांना उपचाराचा खर्च उचलावा लागतो. अत्यंत साध्या घरात ते जीवनातील वास्तवाशी लढत आहेत. बंपर लॉटरी विजेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवारी येथील महापालिकेच्या गोदाम संकुलात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.