Business Success Story: काच कापण्याचं काम करणाऱ्या मुलीने उभारला ४० हजार कोटींचा व्यवसाय

Queen of Mobile Phone Glass : चीनमधील Zhou Qunfei झोऊ क़ुएन्फ़ेइ या महिलेने घडाळ्याच्या कंपनीमध्ये काच कापण्याचं काम करून शिक्षण पूर्ण केलं. पुढे जाऊन स्वत:ची कंपनी उभारली. एकेकाळी मोठ्या कष्टाने केवळ १ डॉलर कमावणाऱ्या झोऊ यांची आज ४० हजार कोटींची कंपनी आहे
Queen of Mobile Phone Glass
Queen of Mobile Phone Glass Esakal
Updated on

अनेक संकटांवर आणि बिटक परिस्थितीवर मात करत यश गाठलेल्या अनेक उद्योगपतींच्या Businessmen कहाण्या आजवर तुम्ही ऐकल्या असतील. काही यशोगाथा जाणून घेतल्याशिवाय हालाखीच्या परिस्थितीवर मात करून मोठं यश गाठता येत यावर विश्वास ठेवणं तसं अनेकांना कठिण वाटतं. Know The Success Story of Queens of Mobile Glass

यासाठी आपण आज एका अशा महिला उद्योजिकेची Entrepreneur यशोगाथा जाणून घेणार आहोत जिने एका छोट्याश्या कंपनीत काचा Glass कापण्याच्या काम करून स्वत:चा व्यवसाय उभारला आणि करोडोची मालकीण झाली. 

चीनमधील Zhou Qunfei  झोऊ क़ुएन्फ़ेइ या महिलेने घडाळ्याच्या कंपनीमध्ये काच कापण्याचं काम करून शिक्षण पूर्ण केलं. पुढे जाऊन स्वत:ची कंपनी उभारली. एकेकाळी मोठ्या कष्टाने केवळ १ डॉलर कमावणाऱ्या झोऊ यांची आज ४० हजार कोटींची कंपनी आहे आणि त्या चायनातील श्रीमंत महिला आहेत.

आज प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईला कंपन्या स्क्रीन ग्रार्ड Mobile Scree Guard बसवतात. स्क्रिनवर स्क्रॅच येऊ नये यासाठी हे बसवलं जातं. झोऊच्या कंपनीने या काचेचा शोध लावला आहे आणि म्हणूनच त्यांना “Queen of Mobile Phone Glass” म्हंटलं जातं. आज झोऊ चायनातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. मात्र इथपर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. 

हे देखिल वाचा-

Queen of Mobile Phone Glass
Entrepreneurs: IAS आणि IPS पदाच्या नोकरीला मारली लाथ; आज आहेत उद्योग जगतातील बादशहा

लहान वयातच अनेक संकटं

१९७० सालामध्ये झोऊचा हुनान राज्यातील एका लहानश्या गावामध्ये जन्म झाला होता. जन्मापूर्वीच एका अपघातात तिच्या वडिलांची दृष्टी गेली होती. तर झोऊ ५ वर्षांची असताना आईचा मृत्यू झाला. डोक्यावर आईचं छत्र नाही आणि अंध वडील यामुळे कमी वयातच असंख्य अडचणींचा सामान करावा लागला. 

अशातच झोऊच्या अंध वडिलांना मिळेल ते काम करून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. झोऊ ज्या गावात राहत होत्या तिथं शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. याकाळी लवकरच मुलींचं लग्न करून दिलं जातं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

हे देखिल पहा-

झोऊची पहिली नोकरी

झोऊ क़ुएन्फ़ेइ यांना परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावं लागलं. लग्नाच्या बेडीत त्यांना अडकायचं नव्हतं. गावात रोजगार नव्हता. यासाठी त्यांनी गाव सोडलं आणि शेनजेन शहरात नोकरीच्या शोधात गेल्या. इथं त्यांना एका घड्याळाच्या कंपनीमध्ये काच कापण्याचं काम मिळालं. नोकरी करत असतानाच शेनजेन यूनिवर्सिटीतून त्यांनी पार्ट टाइम कोर्स करण्यास सुरूवात केली. 

एका मुलाखतीमध्ये झोऊ यांनी त्यांच्या पहिल्या नोकरीचा अनुभव सांगितला आहे. या नोकरीमध्ये त्यांना सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १२ तरी कधी रात्री २ वाजेपर्यंत देखील काम करावं लागायचं असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे इथं ३ महिने काम केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा विचार केला. 

झोऊ यांनी नोकरी सोडण्यासाठी एक रेसिग्नेशन लेटर resignation letter दिलं. या लेटरमध्ये नोकरी सोडण्याचं कारण  त्यांनी इतक्या विशेष शैलीत लिहलं होतं की ते पाहून मॅनेजमेंटला या मुलीमध्ये काहीतरी चमक आहे हे लक्षात आलं. कंपनीने resignation letter नामंजूर केलं आणि झोऊ यांना पद्दोन्नती देऊन दुसऱ्या विभागात शिफ्ट केलं. त्यानंतर पुढे त्यांनी ३ वर्ष तिथं नोकरी केली. 

हे देखिल वाचा-

Queen of Mobile Phone Glass
Entrepreneur Women : बचतगटांच्या माध्यमातून ‘ती’ बनली उद्योगिनी

२२ वर्षी सुरु केली स्वत:ची कंपनी

नोकरी सोडल्यानंतर झोऊ यांनी १९९३ साली कंपनी सुरू करण्याचा विचार केला. यावेळी त्यांच्याकडे ३ हजार डॉलर एवढं सेव्हिंग होतं. हे पैसे आणि काही सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी घड्याळाच्या काचा तयार करण्याती कंपवी सुरू केली. या कंपनीत त्या स्वत: कोणतही लहान मोठं काम करत. 

अरबपती बनण्याचा प्रवास

झोऊ यांच्या कंपनीचा विस्तार हळूहळू वाढत गेला. २००३ सालापर्यंत त्या केवळ घड्याळाच्या काचा तयार करण्याचं काम करत. मात्र एके दिवशी त्यांना मोटोरोला कंपनीतून फोन आला. मोटोरोलाने त्यांना Razr V3 या मोबाईलसाठी काचेची स्क्रीन तयार करण्यासाठी मदत मिळू शकते का? असं विचारलं. 

त्या काळात मोबाईलवर प्लास्टिक स्क्रिन असल्याने स्क्रॅच पडत. मोटोरोलाला एक काचेची स्क्रिन हवी होती. कमी स्क्रॅच पडतील आणि चित्रही स्पष्ट दिसेल, अशी काच तयार करण्यासाठी झोऊ यांनी तयारी दर्शवली. 

२००३ साली त्यांनी LENS Technology ही नवी कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीला काचेवर scratch-resistant coating बनवण्यात यश आलं. त्यानंतर त्यांना HTV, Nokia आणि Samsung कंपनीकडूनही ऑर्डर मिळाल्या. कंपनी चांगली चालू लागली. उत्पन्न वाढू लागलं 

हे देखिल पहा-

Apple च्या ऑर्डरने कोटींचा नफा

२००७ सालामध्ये Appleने मार्केटमध्ये iPhone लॉन्च केला. या फोनला बटणं नसून संपूर्ण स्क्रिन keyboard-enabled glass touch screen होती. नशिबाने झोऊ यांची साथ दिली. Appleने स्क्रिनसाठी झोऊ यांच्या कंपनीची सप्लायर म्हणून निवड केली. झोऊ यांनी त्यांची सर्व मालमत्ता गहाण ठेवून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी इतर काही कंपन्या सुरू केल्या. 

आज या क्षेत्रात अनेक कंपन्या असल्या तर झोऊ यांच्या कंपन्याचं वर्चस्व कायम आहे. शिवाय मोबाईल स्क्रिनसोबत त्यांच्या कंपन्यांमध्ये लॅपटॉप आणि कॅमेराचे टच पॅनल, कव्हर ग्लास यांची देखील निर्मिती केली जाते. विविध देशांसाठी ते या प्रोडक्टचा पुरवठा करतात. कष्ट, हुशारी आणि जिद्दीच्या जोरावर झोऊ यांनी व्यवसायात यश मिळवलं. आज त्या १० बिलियन डॉलर कंपनीच्या मालकीण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.